इंग्लंडचा माजी कर्णधार बॉब विलिस यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन, अॅशेस मालिकेत गोलंदाजीने केली होती कमाल
ते 70 वर्षांचे होते. 1981 च्या अॅशेस मालिकेत विलिसला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आठवले जाईल. ते बऱ्याच दिवसांपासून थायरॉईड कर्करोगाशी झुंज देत होते.
इंग्लंडचा (England) माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज बॉब विलिस (Bob Willis) यांचे बुधवारी थायरॉईड कर्करोगाने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. 1981 च्या अॅशेस (Ashes) मालिकेत विलिसला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आठवले जाईल. ते बऱ्याच दिवसांपासून थायरॉईड कर्करोगाशी झुंज देत होते. गूज (पक्षी) या टोपण नावाने प्रसिद्ध, बॉबच्या कुटुंबात पत्नी, मुलगी, मुलगा आणि बहीण आहेत. माजी कर्णधार बॉबने आपल्या देशासाठी 90 कसोटी सामन्यांमध्ये 325 विकेट घेतले आहेत. एलन वार्ड यांच्या जागी वयाच्या 21 व्या वर्षी 1970-71 मध्ये त्याना अॅशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्थान देण्यात आले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली. हेडिंगलेमधील प्रभावी कामगिरीसाठी ते सर्वाधिक क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यांच्या घातक गोलंदाजीने इंग्लंडला या मैदानावर 1981 च्या अॅशेस मालिकेमध्ये शानदार विजय मिळवून दिला होता. मालिकेच्या तिसर्या कसोटी सामन्यात बॉबने 43 धावा देत 8 विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. इंग्लंडने हा सामना 18 धावांनी जिंकला.
विलिसने 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीदरम्यान, इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी विकेट आणि जगातील दुसरा यशस्वी गोलंदाज म्हणून बॉब निवृत्ती झाले. त्यांच्यापुढे त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा डेनिस लिला होता. बॉबचा इंग्लंडसाठी सर्वाधिक विकेटचा रेकॉर्ड सर इयान बोथम यांनी मोडला. त्यांनी 383 विकेट्स घेतले. आता इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने कसोटीत 575 विकेट घेतले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड 471 विकेटसह दुसर्या स्थानावर आहे.
निवृत्तीनंतर त्यांनी माध्यमात काम करण्यास सुरवात केली. त्यांनी एक क्रिकेट प्रेझेंटरम्हणून देखील काम केलं होतं.