गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून सचिन तेंडुलकर ला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा! पहा खास Tweet

सचिन तेंडुलकरने काही वेळापूर्वी आज वाढदिवसाची सुरूवात आईचा आशिर्वाद घेऊन केली असल्याच सांगत आईनेही त्याला गणपतीचा फोटो गिफ्ट म्हणून दिल्याचं सांगितलं आहे.

Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आज (24 एप्रिल) दिवशी त्याच्या 47 व्या वाढदिवसादिवशी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यामध्ये भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनीदेखील आशिर्वाद दिले आहे. संगीत क्षेत्राप्रमाणेच लता मंगेशकर यांचं क्रिकेटवेड अवघ्या जगाला ठाऊक आहे. त्या सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांनी सचिन तेंडुलकरला पाठीवर शबासकी आणि आशिर्वादही दिले आहे. आजही त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी सचिन तेंडुलकर बरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. (हेही वाचा, Happy Birthday Sachin Tendulkar: 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर याचे 'हे' 5 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड फलंदाजांना करावा लागणार कठोर परिश्रम)

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी," नमस्कार सचिन. आपको जनमदिन की बहुत बहुत शुभकामनाएँ.ईश्वर करे आप की उम्र लम्बी हो और आप हमेशा सुखी रहे ये मेरी मंगल कामना. घरी सगळ्यांना माझा नमस्कार. " असं ट्वीट केले आहे. Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांकडून सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या 'टन' भर शुभेच्छा!; नागरिकांना म्हटले 'स्ट्रेट घरी ड्राईव्ह करा '.  

लता मंगेशकर यांचे ट्वीट

सचिन तेंडुलकरने काही वेळापूर्वी आज वाढदिवसाची सुरूवात आईचा आशिर्वाद घेऊन केली असल्याच सांगत आईनेही त्याला गणपतीचा फोटो गिफ्ट म्हणून दिल्याचं सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउनमुळे यंदा कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. लॉकडाउन दरम्यान सचिन  स्वयंपाक करणे, घर स्वच्छ करणे आणि झाडांना पाणी देऊन वेळ घालवत आहे. सचिन म्हणाला की संध्याकाळीसुद्धा मुलांसाठी घरात राहणे फार कठीण आहे, कारण त्यांना नेहमीच आपल्या मित्रांशी भेटायचे असते, त्यांच्या सोबत फिरायला जायचे असते. पण, लॉकडाउनमुळे त्याला आणि त्याची पत्नी अंजली दोघांना अर्जुन आणि सारासह वेळ घालवायला मिळाला आहे.