T20 World Cup 2024 Super-8 Schedule: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये कधी कुठे अन् कोणत्या संघासोबत होणार सामना? जाणून घ्या सुपर-8 चे संपूर्ण वेळापत्रक
सुपर-8 साठी भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, अमेरिका आणि इंग्लंड पात्र ठरले आहे. तसेच, बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी शेवटचा संघ असु शकतो.
ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मधील (T20 World Cup 2024) सुपर-8 चा (Super -8) थरार 19 जून पासून खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधील 20 संघांने प्रत्येकी चार सामने खेळले असुन 8 संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-8 साठी भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, अमेरिका आणि इंग्लंड पात्र ठरले आहे. तसेच, बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी शेवटचा संघ असु शकतो. दरम्यान, सुपर-8 मध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार आहे हे जाणून घेणार आहोत. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024: भारतीय संघातील 'या' तीन खेळाडूंचा असू शकतो शेवटचा टी-20 विश्वचषक? संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित)
सुपर-8 संघांचे दोन गटात विभागणी
सुपर-8 फेरीत आठ संघाना दोन ग्रुप मध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ 3-3 सामने खेळणार आहे. तसेच, दोन्ही ग्रुपमध्ये टॉप-2 मध्ये जे संघ असतील ते सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाईल.
जाणून घ्या प्रत्येक संघांचे सुपर-8 चे संपूर्ण वेळापत्रक
सुपर-8 मध्ये अमेरिकेचे सामने
- अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 19 जून
- अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज -21 जून
- अमेरिका विरुद्ध इंग्लंड - 23 जून
सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - 19 जून
- अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज - 21 जून
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 23 जून
सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
- अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 19 जून
- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 21 जून
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 23 जून
सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
- अफगाणिस्तान विरुद्ध भारत - 20 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 22 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स - 24 जून
सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - 19 जून
- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 21 जून
- अमेरिका विरुद्ध इंग्लंड - 23 जून
सुपर-8 मधील भारताचे सामने
- अफगाणिस्तान विरुद्ध भारत - 20 जून
- भारत विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड - 22 जून
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 24 जून
सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स - 20 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 22 जून
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - 24 जून
सुपर 8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार, जाणून घ्या काय असेल वेळ
आम्ही तुम्हाला सांगतो की सुपर-8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जातील. सुपर-8 चे काही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता तर काही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवले जातील. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवले जातील.
सुपर-8 गट -
सुपर-8 गट-1
अफगाणिस्तान
भारत
ऑस्ट्रेलिया
बांगलादेश/नेदरलँड
सुपर-8 गट- 2
अमेरिका
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज