'लेकिन दिल साफ है'! विराट कोहलीने 'कॉफी' फोटोवरून केएल राहुलला ट्रोल करण्याचा केला प्रयत्न, बदल्यात मिळाले झकास उत्तर (पाहा Photo)
विराटने फोटोतील कॉफीचा कप खराब असल्याचा रिप्लाय करत राहुलची खोड काढण्याचा प्रयत्न केला.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नुकतच सोशल मीडियावर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने याबाबत जबरदस्त प्रत्युत्तर दिले. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दोन महिने क्रिकेट स्पर्धा ठप्प झाल्याने अन्य खेळाडूंप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू देखील घरी कैद आहेत. अशा स्थितीत भारतीय क्रिकेटपटू सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधून स्वतःला व्यस्त ठेवत आहेत आणि कोहली आणि राहुलमधेही अशीच एक चर्चा रंगली. राहुलने स्वत:चा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला ज्यामध्ये तो घरी बसून कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे. या फोटोला त्याने केवळ कॉफी इतकेच कॅप्शन दिले. कर्णधार विराट कोहलीने या फोटोवरून राहुलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला,पण राहुलने एकदम झकास उत्तर देऊन सर्वांची मनं जिंकली. विराटने फोटोतील कॉफीचा कप खराब असल्याचा रिप्लाय करत राहुलची खोड काढण्याचा प्रयत्न केला. (हार्दिक पांड्याने भाऊ क्रुणालसोबत कॅरम खेळतानाचा फोटो केलाशेअर, पाहून विराट कोहली झाला लोटपोट)
पण, राहुलने जबरदस्त रिप्लाय दिला आणि विराटची बोलती बंद केली. राहुल म्हणाला, "माझं हृदय मात्र एकदम साफ आहे." कोहलीनेही ते मान्य केले "हाहा... ते तर खरं आहे," असे प्रत्युत्तर दिले.
केएल राहुलचे पोस्ट!!
कोहली-राहुलमधील थट्टामस्करी
दुसरीकडे, नुकतच राहुलने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या आवृत्तीसंदर्भात खुलासा केला. बीसीसीआयने कोरोना व्हायरसच्या धोक्याचा विचार करून अनिश्चित काळासाठी स्थगित केले. “मी आयपीएल खरंच खूप मिस करत आहे. माझ्यासाठी संघाचे नेतृत्व करणे हा एक मोठा हंगाम ठरणार होते आणि मला असे वाटले की आम्हाला लाईन-अपमध्ये खरोखर खरोखर उत्साही खेळाडू मिळालेले आहेत," बीसीसीआयच्या टीव्हीवरील 'ओपन नेट्स विथ मयंक' शो दरम्यान राहुलने संघातील सहकारी मयंक अग्रवालला सांगितले. "मी क्रिस गेल, तू, ग्लेन मॅक्सवेल आणि काही इतर लोकांसह येण्याची उत्सुकने वाट पाहत होतो," तो पुढे म्हणाला.