KKR Vs RCB, IPL 2020 Live Streaming: कोलकात नाईट राईडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
KKR vs RCB (Photo Credits: File Photo)


आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 39व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शेख जायद स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करत आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे कर्णधार पद विराट कोहली संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

या हंगामात कोलकाताचा संघ संघर्ष करताना दिसला आहे. तर, बेंगलोरचा संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, बेंगलोरचा संघ 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. कोलकाच्या संघाने 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, दुसरीकडे बेंगलोरच्या संघानेही 9 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL 2020, MNS On Disney-Hotstar: Amazon नंतर मनसेचा मोर्चा आयपीएलकडे, मराठी समालोचन पर्यायासाठी डिस्ने हॉटस्टारला इशारा

संघ-

कोलकाता नाईट राईडर्स-

इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शिवम मावी, टॉम बंटन, संदीप वॉरियर, कुलदीप यादव, पॅट कमिन्स, सुनील नरेन, निखिल नाईक, मणिमरण सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रशांत कृष्ण, शुभमन गिल, नितेश राणा, सिद्धेश लाड , कमलेश नगरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर-

विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, आरोन फिंच, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, इसुरु उदाना, जोशुआ फिलिप, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, अ‍ॅडम झांपा.