KKR Retention 2025: KKRने IPL 2025 साठी 6 खेळाडूंना रिटेन केले, चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले

वरुण चक्रवर्ती 12 कोटी, सुनील नारायण 12 कोटी, आंद्रे रसेल 12 कोटी, हर्षित राणा 4 कोटी आणि रामनदिन सिंगला 4 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहे.

Shreyas Iyer (Phhoto Credit - Twitter)

KKR Retention 2025:  कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 साठी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये कोलकात्याला चॅम्पियन बनवणारा कर्णधार श्रेयस अय्यर रिलीज झाला आहे. आगामी हंगामासाठी केकेआरने एकूण 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेल, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, रमणदीप सिंग आणि हर्षित राणा यांना आयपीएल 2025 साठी कायम ठेवले आहे. केकेआरने 4 कॅप्ड खेळाडू आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले आहे.  (हेही वाचा -  IPL 2025 Retention Live Updates: CSK, RCB, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर)

रिंकू सिंग, ज्याची किंमत 55 लाख रुपये होती, त्याला केकेआरने 13 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. वरुण चक्रवर्ती 12 कोटी, सुनील नारायण 12 कोटी, आंद्रे रसेल 12 कोटी, हर्षित राणा 4 कोटी आणि रामनदिन सिंगला 4 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहे.

आयपीएल 2025 साठी प्रत्येक संघाचे पर्स मूल्य 120 कोटी रुपये आहे. यापैकी सर्व संघांना जास्तीत जास्त सहा खेळाडू कायम ठेवावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने आपले सर्व 6 खेळाडू कायम ठेवले आहेत. केकेआरने रिंकू सिंगला 13 कोटी, वरुण चक्रवर्तीला 12 कोटी, सुनील नारायणला 12 कोटी, आंद्रे रसेलला 12 कोटी, हर्षित राणाला 4 कोटी आणि रमणदीप सिंगला 4 कोटींमध्ये कायम ठेवले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने 6 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 120 कोटींपैकी 57 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता IPL 2025 च्या मेगा लिलावात KKR कडे 63 कोटी रुपये असतील.

कोलकाता नाईट रायडर्सने आपला कर्णधार श्रेयस अय्यरला सोडले आहे. अशा परिस्थितीत आता केकेआरला लिलावातून कर्णधार विकत घ्यावा लागेल किंवा राखून ठेवलेल्या खेळाडूंपैकी एकाकडे कमान सोपवावी लागेल. केकेआरला सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवायचे आहे, असे याआधी सांगितले जात होते, मात्र सूर्या आता मुंबईतच राहणार आहे. अशा स्थितीत केकेआरला नवा कर्णधार शोधावा लागेल.