Ball Tampering in IND-PAK Series: भारत-पाकिस्तान मालिकेत बॉल टेंपरिंगबाबत भारताचे माजी विकेटकीपर किरण मोरे यांनी केले धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर

भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांनी 1989 भारत-पाकिस्तान कसोटी मालिकेदरम्यान बॉल टॅम्परिंगचे प्रकरण उघडकीस आणले आणि त्यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू रिव्हर्स स्विंगसाठी बॉलशी छेडछाड कसे करायचे हे त्यांनी सांगितले. 1989 भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामधील मोरे यांनी घटना सांगितली.

भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे (Photo Credit: Getty)

भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे (Kiran More) यांनी 1989 भारत (India)-पाकिस्तान (Paistan) कसोटी मालिकेदरम्यान बॉल टॅम्परिंगचे प्रकरण उघडकीस आणले आणि त्यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू रिव्हर्स स्विंगसाठी बॉलशी छेडछाड (Ball Tampering) कसे करायचे हे त्यांनी सांगितले. 1989 भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामधील मोरे यांनी घटना सांगितली. या मालिकेत सचिन तेंडुलकर आणि वकार युनूस आणि आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रिव्हर्स स्विंग आणण्यासाठी दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी चेंडूशी छेडछाड केली असे मोरे म्हणाले. मोरे यांनी The Greatest Rivalry पॉडकास्टमध्ये म्हटले की, “त्या दिवसांत चेंडूला छेडछाड करण्याची परवानगी होती जेणेकरून गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळू शकेल. त्यावेळी दोन्ही संघांपैकी कुणीही याबद्दल तक्रार करत नव्हते. प्रत्येक गोलंदाज चेंडूशी छेडछाड करायचा. त्यावेळी फलंदाजी करणे सोपे नव्हते. मनोज प्रभाकर यांनीही त्या संघाला शिकवले की तो चेंडू कसा स्क्रॅच करायचा आणि चेंडू रिव्हर्स स्विंग कसा करावा आणि पाकिस्तानला ते आव्हानात्मक वाटले.” (सचिन तेंडुलकरने नेहमी पहिला बॉल खेळण्यास सौरव गांगुलीला भाग पाडले? माजी कर्णधाराने सांगितलेला धमाल किस्सा ऐकून तुम्हीही नक्कीच हसाल Watch Video)

या मालिकेतील अंपायरांपैकी जॉन होल्डर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की इमरान खान आणि क्रिस श्रीकांत या दोन कर्णधारांसमवेत त्यांनी या विषयावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण ज्या शिक्षा देऊ शकाल असे कोणतेही गुन्हे घडले नाहीत. होल्डर हे माजी इंग्लंड क्रिकेटपटू होते आणि 1988 मध्ये पहिल्या कसोटी सामन्यात अम्पायरिंग केली.

मोरे म्हणाले, “त्या दिवसांत विकेट पडल्यावर अंपायर चेंडू त्यांच्याबरोबर ठेवत नसायचे. त्यामुळे खेळाडू बॉल स्क्रॅच करायचे.” 2018 मध्ये होल्डर यांनी मिड-डे वृत्तपत्राला सांगितले, “त्यावेळी ते कायदेशीर होते. आम्ही काहीही करू शकत नव्हतो, आम्ही शक्तीहीन होतो कारण आम्ही अंमलात आणू शकणारा कायदा नव्हता. पण नंतर पुन्हा कायदे बनविण्यात आले आणि बॉल टेम्परिंगवर पेनल्टी धावा देण्याची सुरुवात झाली. उर्वरित सामन्यांमध्येही त्यांनी गोलंदाजांवर निर्बंध घालण्यास सुरवात केली.”

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now