SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 13 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकवर होता. विप्राज दुसऱ्या धावेसाठी धावत असताना रनआऊट झाला.
Kavya Maran’s Reaction to Vipraj Nigam’s Run Out in SRH vs DC: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) मालकीण काव्या मारन (Kavya Maran) सामन्यात रोमांच वाढवण्यासाठी नेहमी उपस्थित राहते. ती लिलावाच्या टेबलपासून ते हैदराबादच्या जवळजवळ प्रत्येक सामन्यात दिसते. सोमवारी राजीव गांधी स्टेडियमवर (Rajiv Gandhi Stadium) एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यातही, काव्या मारन स्टँडमधून संघाला पाठिंबा देत होती. सामना हैदराबाद हरला. त्याचवेळी ते आयपीएलमधून बाहेरही पडले. आयपीएलमधून बाहेर पडणारा हैदराबाद हा दुसरा संघ ठरला. मात्र दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज विप्राज निगम आऊट झाल्यानंतर, तिची अॅक्शन चर्चेचा विषय ठरली.
विप्राज निगम झाला रनआऊट
झीशान अन्सारी दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 13 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रिस्टन स्टब्स स्ट्राईकवर होता. स्टब्स शॉट खेळल्यानंतर पहिल्या धावेसाठी धावला. यानंतर त्याचा साथीदार विप्राज दुसऱ्या धावेसाठी धावला पण स्टब्स त्याला नको म्हणत होता. मात्र विप्राज खाली मान खालून धावत असल्याने त्याला ते समजले नाही. अशा परिस्थितीत, दोन्ही फलंदाज एकाच टोकाला उभे राहिले. ज्यामुळे विप्राज रनआऊट झाला.
विप्राजच्या आऊटवर काव्याने वेधलं सर्वांच लक्ष
विप्राज 18 धावा करून आऊट झाला. विप्राज निगमच्या रनआऊट होण्यावर काव्या मारन भलतीच खूश दिसली. तिने आक्रमक रिअॅक्शन दिली. तिने हात हलवून जाण्याचा इशारा देत होती. तयाशिवाय, यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभावही आक्रमक होते. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून फलंदाजीला आल्यानंतर दिल्लीने 20 षटकांत सात गडी गमावून 133 धावा केल्या. त्यांच्याकडून ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी 41-41 धावांची खेळी केली. हैदराबादकडून पॅट कमिन्सने तीन तर जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)