Corona Free New Zealand: कोरोना विरोधातील लढ्याबद्दल जेम्स नीशम याच्याकडून देशाचे कौतुक; फॅनच्या 'मुंबईत NZ पेक्षा जास्त लोकसंख्या' ट्विटवर दिली मजेदार प्रतिक्रिया
यानंतर किवी क्रिकेटर सोमवारी ट्विट करुन देशातील जनतेचे अभिनंदन केले. एका यूजरने क्रिकेटपटूला मुंबई शहरात न्यूझीलंडपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याची जाणीवही करुन दिली. यावर नीशमने रोचक प्रतिक्रिया दिली.
जगभरात आजवर अनेक देशांना कोरोना व्हायरसने (Coronavirus) जखडले असून भारत सध्या 5 व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड मधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. न्यूझीलंडने त्यांचा संपूर्ण देश हा कोरोनामुक्त झाला आहे असे घोषित केले आहे. न्यूझीलंडमध्ये शेवटचा सक्रिय कोविड-19 (COVID-19) रुग्ण बरा झाला आहे आणि न्यूझीलंडमध्ये आता कोरोनाचं एकही प्रकरण नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. यानंतर किवी क्रिकेटर जेम्स नीशमने (Jimmy Neesham) सोमवारी ट्विट करुन देशातील जनतेचे अभिनंदन केले. नीशमने ट्विट केले की, "कोरोना व्हायरसमुक्त न्यूझीलंड!" सर्वांचे अभिनंदन. पुन्हा एकदा त्या महान किवी वैशिष्ट्यांमुळे - नियोजन, दृढनिश्चय आणि कार्यसंघ कार्य." न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या एकूण 1,504 रुग्णांची पुष्टी झाली आहे असून संसर्गामुळे 22 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. निशमच्या पोस्टला अनेक अभिनंदन प्रतिक्रिया मिळाल्या. (Coronavirus: कोट्याधीश फुटबॉलर नेमार याने ब्राझील सरकारकडून कोरोना व्हायरस वेलफेर पेमेंट योजनेंतर्गत मदतीसाठी केला अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रकार)
एका यूजरने क्रिकेटपटूला मुंबई (Mumbai) शहरात न्यूझीलंडपेक्षा अधिक लोकसंख्या असल्याची जाणीवही करुन दिली. युजरने नीशमच्या पोस्टला रिप्लाय देताना लिहिले, "तुमची लोकसंख्या 4 लाख आहे. न्यूझीलंडपेक्षा मुंबईची लोकसंख्या जास्त आहे." यावर नीशमने रोचक प्रतिक्रिया दिली.
पाहा निशमचे ट्विट:
न्यूझीलंडच्या सीमा नियंत्रण नियम कडक कायमच राहतील, असे असताना न्यूझीलंडचे पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न म्हणाल्या की सोशल डिस्टंसिंग आणि सार्वजनिक मेळाव्यावर मर्यादा यासारख्या निर्बंधांची आता गरज नाही. “आम्हाला विश्वास आहे की आम्ही आत्तासाठी न्यूझीलंडमध्ये विषाणूचे संक्रमणास दूर केले आहे.” 17 दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही आणि सोमवारी अखेरचा कोरोना सक्रिय रुग्ण बरा होऊन घरी परतला.