Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत घेतल्या 5 विकेट; मोडला कपिल देवचा विक्रम
त्याने 5 विकेट घेत कपिल देवचा विक्रम मोडला.
Jasprit Bumrah: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ट्रॅव्हिस हेड टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करत राहिला. बुमराहने गाबात तिसऱ्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेतल्या आहेत. याआधी पर्थ कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराहने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आणि शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेत आतापर्यंत बुमराह हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ज्याने ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
बुमराहने कपिल देवचा विक्रम मोडला
जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेत भारताचा माजी कर्णधार कपिल देवचा मोठा विक्रम मोडला. बुमराहने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया देशांसह 8व्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता, ज्यांनी त्यांच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत एकूण 7 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह - 8 वेळा
कपिल देव - 7 वेळा
झहीर खान - 6 वेळा
भागवत चंद्रशेखर - 6 वेळा
एक आशियाई गोलंदाज म्हणून, जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानची बरोबरी केली आहे. वसीम अक्रमचे नाव या यादीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 11 वेळा हा पराक्रम केला होता.