Virat Kohli-James Anderson Battle: विराट कोहलीचे आव्हान पेलण्यासाठी जेम्स अँडरसन सज्ज, 2018 भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या आठवणींना दिला उजाळा
2014 अँडरसनच्या नावी राहिला, जिथे त्याने भारतीय कर्णधाराला चार वेळा बाद केले, तर 2018 विराटने आपल्या नावावर केला. अँडरसनने टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विराटविरुद्ध लढत आणि 2018 मधील भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, पुढील वर्षी इंग्लंडच्या भारत दौऱ्याबाबत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन म्हणाला की भारतीय संघाचा कर्णधार कोहलीविरूद्ध 'कठोर लढाई'साठी तो सज्ज आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि जेम्स अँडरसन (James Anderson) हे सध्या विश्व क्रिकेटमध्ये आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाज आहेत यात शंका नाही. चाहत्यांना आजवर दोन्ही खेळाडूंमध्ये शानदार लढत अनुभवायला मिळाली आहे. 2014 अँडरसनच्या नावी राहिला, जिथे त्याने भारतीय कर्णधाराला चार वेळा बाद केले, तर 2018 विराटने आपल्या नावावर केला, जिथे तो एकदाही अँडरसनविरुद्ध इंग्लंड दौऱ्यावर दोन शतकं ठोकली. अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध घरच्या मालिकेत अँडरसन सर्वाधिक 600 विकेट (Anderson Test Wickets) घेणाऱ्या वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसनने टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विराटविरुद्ध लढत आणि 2018 मधील भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या (India Tour of England) आठवणींना उजाळा दिला. “त्या गुणवत्तेच्या फलंदाजांला गोलंदाजी करणे कठीण असते. ही एक कठीण लढाई असेल परंतु मला त्यात आनंद मिळतो. सर्वोत्कृष्ट खेळाडूला बाद करण्यासाठी प्रयत्नशील असतो,” अँडरसनने टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टला सांगितले. (James Anderson Take 600 Wickets in Tests: इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला)
2014 मध्ये भारताच्या इंग्लंड दौर्यादरम्यान कोहलीविरूद्ध केलेल्या यशाची आठवण करून देताना अँडरसन म्हणाला की कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर असुरक्षित होता. या दौऱ्यावर विराट मालिकेत 134 धावत करू शकला. "2014 मध्ये त्याच्या विरुद्ध मला काही प्रमाणात यश मिळाले आणि त्यानंतर तो 2018 मध्ये पूर्णपणे वेगळ्या खेळाडूच्या रूपात परतला आणि तो अविश्वसनीय होता,” अँडरसन म्हणाला. 2018 मध्ये कोहली इंग्लंडमध्ये परत आला आणि त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह मालिकेत सर्वाधिक 593 धावा केल्या.
2018 मध्ये कोहलीच्या फलंदाजीत काय बदल पाहिले, असे विचारले असता अँडरसन म्हणाला, “त्याने 2018 मध्ये चेंडू खरोखरच चांगले सोडले. पहिल्यांदा तो आला (2014 मध्ये), जेव्हा मी आउट-स्विंजर्सला गोलंदाजी करीत असता तेव्हा कदाचित तो त्याचा पाठलाग करायचा आणि त्यामुळे एज आणि स्लिप्स पाहायला मिळाले. त्याने हे बरेच चांगले सोडले आणि 2018 मध्येतो खूपच धैर्यवान होता. त्याने त्याच्याकडे गोलंदाजी करण्यासाठी वाट पहिली आणि त्यानंतर तो त्याच्या पायाची ताकद वापरली जेणेकरून तो मुक्तपणे स्कोअर करू शकला,” इंग्लंडचा सर्वात यशस्वी टेस्ट गोलंदाज म्हणाला.