IPL Update: सौरव गांगुलीच्या जागी गौतम गंभीरला कर्णधार बनवल्यावर म्हणाला काय होता शाहरूख खान, गंभीरनेच सांगितला कर्णधार बदलल्यानंतरचा रंजक किस्सा

कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) माजी कर्णधार गौतम गंभीरने 2011 मध्ये फ्रँचायझीचा मालक शाहरुख खान याच्याशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. केकेआरने गंभीरला 11.04 कोटी रुपयांत खरेदी केले. त्यानंतर गंभीरने कर्णधार म्हणून एक वेगळी छाप पाडली. या दरम्यान, गंभीरने कोलकाता संघाच्या कर्णधारपदाबद्दल एक रंजक किस्सा सांगितला.

शाहरुख खान आणि गौतम गंभीर (Photo Credit: PTI and Getty)

कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) माजी कर्णधार गौतम गंभीरने (Gautam Gambhidr) 2011 मध्ये फ्रँचायझीचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्याशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या सर्वात प्रसिद्ध फ्रॅंचायझींपैकी एक, केकेआरने सुरुवातीच्या काळात प्रभावी सुरुवात केली नाही. गंभीरच्या सक्रिय आणि आक्रमक कॅप्टीन्सीने त्यांचे भविष्य बदलत गेले. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनदा आयपीएलच्या जेतेपदाची मान मिळवला. आयपीएलच्या पहिल्या तीन वर्षातील खराब कामगिरीनंतर केकेआर व्यवस्थापनाने जागी सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) गंभीरला कर्णधारपद देण्याचा धाडसी निर्णय घेतला. लिलावात गांगुलीला केकेआरने खरेदी केले नाही आणि त्यावेळी गंभीर त्याच्या सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. केकेआरने गंभीरला 11.04 कोटी रुपयांत खरेदी केले. त्यानंतर गंभीरने कर्णधार म्हणून एक वेगळी छाप पाडली. या दरम्यान, गंभीरने कोलकाता संघाच्या कर्णधारपदाबद्दल एक रंजक किस्सा सांगितला. (इंग्लंडच्या 2014 घातक दौर्‍यानंतर विराट कोहलीला पाठिंबा देण्याचे श्रेय महेंद्र सिंह धोनीला दिले पाहिजे, गौतम गंभीरकडून 'कॅप्टन कूल'चे कौतुक)

संघाचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याने गंभीरवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपद देण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यावेळची आठवण गंभीरने 'क्रिकेट कनेक्टेड' कार्यक्रमात सांगितली. गंभीर म्हणाला, “शाहरूखने मला कर्णधारपद सोपवताना सांगितलं होतं की हा तुझा संघ आहे. मी यात ढवळाढवळ करणार नाही… त्यावर मी त्याला एक वचन दिलं होतं की मी पुढचे किती वर्ष संघाचा कर्णधार असेन हे मला माहिती नाही, पुढचे तीन वर्ष किंवा सहा वर्ष जोपर्यंत मी संघाचे नेतृत्व करेन, तोपर्यंत मी दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. पण एक मात्र नक्की की जेव्हा मी संघाचं कर्णधारपद सोडेन तेव्हा संघ आतापेक्षा खूप चांगल्या स्थितीत असेल.”

गंभीरने 2018 मध्ये केकेआरची साथ सोडली आणि दिल्ली फ्रँचायसीमध्ये सामील झाला. त्यापूर्वी गंभीरने त्याच्या नेतृत्वात केकेआरला 2012 आणि 2014 आयपीएल जेतेपदाची मान मिळवून दिला होता. तत्पूर्वी, गंभीरने हे उघड केले होते की जर कॅरेबियन फलंदाज आंद्रे रसेलने त्याच्या नेतृत्वात आणखी काही वर्षे खेळली असती तर कोलकाता फ्रँचायझीने अधिक आयपीएल जेतेपद जिंकली असती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now