IPL 2008 लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने विराट कोहलीला का खरेदी केले नाही? आयपीएलचे माजी COO ने सांगितले कारण
यावर सर्वांचे लक्ष विराट कोहलीकडे होते, कोहलीपेक्षा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला प्राधान्य देऊन आपल्या संघात करत दिल्ली फ्रँचायझीने सर्वांनाच चकित केले. पण विराट कोहलीला त्यांच्या संघात निवडण्याची संधी डेअरडेव्हिल्सने का सोडून दिली?
2008 मध्ये क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध लीग इंडियन प्रीमिअर लीगची (Indian Premier League) सुरुवात झाली. त्याच वर्षी दिल्लीचा युवा क्रिकेटपटू विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारताने अंडर-19 वर्ल्ड कपचे (U19 World Cup) जेतेपद जिंकले. यावर सर्वांचे लक्ष विराट कोहलीकडे होते आणि आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) देखील अनेक फ्रँचायझींनी त्याच्या सोबत करार करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली डेअरडेव्हिल्स (Delhi Daredevils) कडे त्यांची निवड करण्याची संधी होती आणि चाहत्यांनाही वाटले की ते विराटची निवड करतील. पण कोहलीपेक्षा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवानला प्राधान्य देऊन आपल्या संघात करत दिल्ली फ्रँचायझीने सर्वांनाच चकित केले. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (Royal Challengers Bangalore) सध्याचा भारतीय कर्णधार मिळाला आणि ते त्यांचे मास्टरस्ट्रोक ठरले. पण विराट कोहलीला त्यांच्या संघात निवडण्याची संधी डेअरडेव्हिल्सने का सोडून दिली? आयपीएलचे माजी सीओओ सुंदर रमन यांनी डीडीला त्यांच्या संघात आणखी एक फलंदाज नको होता आणि म्हून त्यांनी कोहलीऐवजी गोलंदाजाची निवड केली. (सौरव गांगुलीच्या जागी गौतम गंभीरला कर्णधार बनवल्यावर म्हणाला काय होता शाहरूख खान, गंभीरनेच सांगितला कर्णधार बदलल्यानंतरचा रंजक किस्सा)
“विशेष म्हणजे लिलावाच्या अवघ्या एक महिन्यापूर्वी भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांचा कर्णधार विराट कोहली होता आणि आम्ही लिलावाच्या काही दिवसानंतर अंडर-19 खेळाडूंसाठी वेगळा द्राफ्ट ठेवण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य, आश्चर्य! ड्राफ्टमध्ये निवडलेला विराट कोहली हा पहिला खेळाडू नव्हता,”‘22 यार्न’ पॉडकास्टवर रमण यांनी गौरव कपूरला सांगितले. “दिल्लीने त्याऐवजी प्रदीप सांगवानला निवडले, कारण त्यांना दुसर्या फलंदाजाची गरज नाही असे म्हटले. त्यांच्याकडे वीरेंद्र सहवाग आणि एबी डिव्हिलियर्स होते. ते बरोबर विचार करत होते, परंतु आरसीबीने त्याला खरेदी केलेलं आणि बाकीचे, ते म्हणतात जसे की इतिहास आहे,” रमण पुढे म्हणाले.
दुसरीकडे, 169 डावात विराटने 37 च्या सरासरीने 5412 धावा केल्या असून आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान, सांगवानने आयपीएलमध्ये 39 सामने खेळले तर 8.79 च्या इकॉनॉमीने 35 गडी बाद केले. तथापि, यादृच्छिक डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर 15 महिन्यांची बंदी घातली. 2011 मध्ये दिल्ली सोडल्यापासून त्याची कारकीर्द ढासळत आहे.