IPL 2025: आयपीएल चॅम्पियन आरसीबीवर पैशांचा पाऊस; पंजाब किंग्जलाही मिळाले करोडो रुपये, पहा पुरस्कारांची यादी

आयपीएल चॅम्पियन आरसीबीवर पैशांचा पाऊस पडत आहे. पंजाब किंग्ज संघालाही करोडो मिळाले आहेत. पहा पुरस्कारांची संपूर्ण यादी.

IPL 2025: आयपीएल चॅम्पियन आरसीबीवर पैशांचा पाऊस; पंजाब किंग्जलाही मिळाले करोडो रुपये, पहा पुरस्कारांची यादी
PC-X

IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपद जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. आयपीएल (IPL 2025) सुरू झाल्यापासून आरसीबीने तब्बल 18 वर्षात अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यानंतर पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. आयपीएल 2025 पुरस्कारांची संपूर्ण यादी पाहूयात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात (RCB vs PBSK IPL 2025 Final) काल 3 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामा फायनल खेळवला गेला. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला.

आयपीएल 2025च्या अंतिम सामन्यानंतर, पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये उपविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडला. याशिवाय, स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले. विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 20 कोटी रुपये मिळाले. तर उपविजेत्या पंजाब किंग्जला 12.50 कोटी रुपये मिळाले.

आयपीएल 2025 मधील टॉप- 4 संघांची बक्षिसे

• विजेता संघ (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - 20 कोटी रुपये

• उपविजेता (पंजाब किंग्ज) - 12.5 कोटी रुपये

• तिसऱ्या क्रमांकाचा संघ (मुंबई इंडियन्स) - 7 कोटी रुपये

• चौथ्या क्रमांकाचा संघ (गुजरात टायटन्स) - 6.5 कोटी रुपये

या खेळाडूंना मिळाली बक्षिसे

• एका हंगामात सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप) - साई सुदर्शन (759 धावा), 10 लाख रुपये

• एका हंगामात सर्वाधिक विकेट्स (पर्पल कॅप) - प्रसिद्ध कृष्णा (25 विकेट्स), 10 लाख रुपये

• हंगामातील उदयोन्मुख खेळाडू - साई सुदर्शन, 10 लाख रुपये

• हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू - सूर्यकुमार यादव, 15 लाख रुपये

• हंगामातील सुपर स्ट्रायकर- वैभव सूर्यवंशी, टाटा कर्व ईव्ही कार

• सर्वाधिक षटकार हंगाम- निकोलस पूरन, 10 लाख रुपये

• हंगामात सर्वाधिक डॉट बॉल - मोहम्मद सिराज, 10 लाख रुपये

• हंगामातील सर्वोत्तम झेल - कामिंदू मेंडिस, 10 लाख रुपये

• हंगामात सर्वाधिक चौकार - साई सुदर्शन, 10 लाख रुपये

• फेअर प्ले पुरस्कार: चेन्नई सुपर किंग्ज

• खेळपट्टी आणि मैदान पुरस्कार: डीडीसीए (दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट संघटना), 50 लाख रुपये

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 09:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).