IPL 2025 Retention Live Updates: CSK, RCB, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी केली जाहीर

मुंबई

IPL 2025 Retention Live Updates: गेल्या दिवसापासून रिटेशन संदर्भात अनेक  बातम्या समोर आल्या आहेत. कधी चेन्नई सुपर किंग्ज रवींद्र जडेजाला सोडणार असल्याचे सांगण्यात आले, तर काही रिपोर्ट्समध्ये ऋषभ पंत, आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बरं, आता थोड्याच वेळात सर्व काही स्पष्ट होईल. काही वेळातच सर्व संघ त्यांच्या सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील.  (हेही वाचा  -  IPL Mega Auction 2025: RCB या दिग्गज खेळाडूला सोडणार, लिलावापूर्वी समोर आली मोठी माहिती )

दरम्यान CSK, RCB, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्जने (Punjabs Kings) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर  केली.  मुंबई इंडियन्सने माजी कर्णधार रोहित शर्मा, सध्याचा कर्णधार हार्दिक पांड्या, मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवले आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.30 कोटी रुपयामध्ये तर  जसप्रीत बुमराहाला सर्वाधिक 18 कोटी रुपयांमध्ये  रिटेन केले आहे.  सूर्यकुमार यादव 16.35 कोटी रुपये,  हार्दिक पांड्या 16.35 कोटी रुपये, तिलक वर्मा 8 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.

पंजाब किंग्जने अतिशय आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबने प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंगला कायम ठेवले आहे. हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड आहेत.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केवळ तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. आरसीबीने विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांना कायम ठेवले आहे. ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस आणि मोहम्मद सिराज या स्टार खेळाडूंनाही सोडण्यात आले आहे.

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. चेन्नईने रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, शिवम दुबे, एमएस धोनी आणि मथिशा पाथिराना यांना कायम ठेवले आहे.