IPL 2023: आयपीएलचा थरार आजपासून सुरु, ओपनिंग सेरेमनीला बॉलिवुडच्या दिग्गजांची हजेरी
यावेळी मोठे मोठे कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
महिला प्रिमियर लीग (WPL) च्या पहिल्या हंगामाला भारतात मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) या ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या 16 व्या अध्यायाला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या गुजरात टायटन्सपुढे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान असेल. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीचा हा अखेरचा आयपीएल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आयपीएलच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली असून भारतीय सिनेसुष्टीतील मोठे मोठे कलाकार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोरोनाच्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआय मोठ्या जल्लोषात आयपीएलची सुरुवात करणार आहे. यावेळी मोठे मोठे कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहे. गायक अरजीत सिंह या सोहळ्याला चार चांद लावण्याची शक्यता आहे यांच्या सोबतच तमन्ना भाटीया आणि रश्निका मंदाना या देखील सोहळ्यात परफॉर्मंस करताना दिसत आहे. यासोबत आणखी कोणते कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार याची माहिती अद्याप मिळाली नाही.
आज गुजरात टायटन्सपुढे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे आव्हान असणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होणार असून स्टार स्पोर्ट्सवर हा सामना सुरु होणार आहे. यापुर्वी आयपीएलच्या रंगतदार सोहळ्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला बॉलीवुडसोबतच अनेक राजकीय नेते देखील हजेरी लावणार असल्याचे समजत आहे.