IPL 2022 WAGs: आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडका लावणार ‘या’ स्टार खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड; धनश्री ते नताशा सारख्या सौंदर्यवतींचा समावेश (See Photos)
प्रत्येक इंडियन प्रीमियर लीग (IPL) आवृत्तीप्रमाणे, या वर्षी देखील, केवळ मैदानावरील खेळाडूंवरच लक्ष केंद्रित केले जाणार नाही तर स्टेडियममध्ये त्यांना चीअर करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडवर देखील यादरम्यान चाहत्यांचे लक्ष असेल. यादरम्यान आपण आयपीएल 2022 च्या आवृत्तीतील पाच सर्वात हाय-प्रोफाइल आणि ग्लॅमरस WAGs वर एक नजर टाकूया.
प्रत्येक इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आवृत्तीप्रमाणे, या वर्षी देखील, केवळ मैदानावरील खेळाडूंवरच लक्ष केंद्रित केले जाणार नाही तर स्टेडियममध्ये त्यांना चीअर करण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडवर देखील यादरम्यान चाहत्यांचे लक्ष असेल. आयपीएलच्या (IPL)15 व्या हंगामातील काही लोकप्रिय खेळाडूंच्या WAGs मुंबईतील बहुतांश सामन्यांना उपस्थित राहणार असल्यामुळे आयपीएलचे (IPL) स्टँड्स चकचकीत आणि ग्लॅमरने भरपूर असेल. क्रीडा प्रस्तुतकर्ता संजना गणेशन हिचे देखील नुकतंच स्टार भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याशी लग्न झाल्याने ती देखील आता WAG च्या यादीतही उतरली आहे. यादरम्यान आपण आयपीएल 2022 च्या आवृत्तीतील पाच सर्वात हाय-प्रोफाइल आणि ग्लॅमरस WAGs वर एक नजर टाकूया. (IPL मध्ये षटकारांची आतषबाजी करण्यात ‘हा’ संघ पटाईत; तर MS Dhoni आहे 20व्या षटकाचा सिकंदर, पोलार्ड आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माही मागे नाही)
अनुष्का शर्मा (Anushka Sharma)
विराट कोहली यावर्षीपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार म्हणून खेळणार नसला तरी पत्नी आणि बॉलीवूड स्टार अनुष्का शर्मा 2022 च्या आयपीएलमध्ये तिच्या पतीला चीअर करण्यासाठी काही सामन्यांसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
धनश्री वर्मा (Dhanashree Verma)
अनुष्का तितकी प्रसिद्ध नसली तरी धनश्री इतर कोणत्याही WAG पेक्षा कमी कमी नाही. दोन वर्षांपूर्वी भारतीय लेग-स्पिनर युजवेंद्र चहल आणि धनश्री लग्नबंधनात अडकले. यानंतर तिने आयपीएल 2021 मध्ये प्रथमच येऊन तिने चाहत्यांचे लक्ष वेधले.
View this post on Instagram
संजना गणेशन (Sanjana Ganesan)
संजना गणेशन ही स्पोर्ट्स अँकर आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी आहे. गणेशन आयपीएल 2022 दरम्यान होस्ट ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी सादरकर्ता आणि अँकर म्हणून उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
View this post on Instagram
नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic)
नताशा स्टेनकोविक ही सर्बियन डान्सर असून ती टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची पत्नी आहे. हार्दिक आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे, त्यामुळे नताशा या दरम्यान त्याला पाठिंबा देण्यासाठी नक्कीच उपस्थित असेल. याशिवाय हार्दिक 2017 मध्ये त्याच्या आक्रमक फलंदाजीने सुपरस्टार बनला परंतु करण जोहरच्या कुप्रसिद्ध मुलाखतीमुळे त्याला आक्रमक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.
View this post on Instagram
पंखुडी शर्मा (Pankhuri Sharma)
पंखुडी भारतीय अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याची पत्नी आहे. 2017 मध्ये लग्नानंतर पंखुडी पती कृणालला चीअर करण्यासाठी नियमितपणे स्टेडियममध्ये उपस्थित असायची. आणि आता यावेळी कृणाल लखनऊ फ्रँचायझीकडून एका नव्या इनिंगची सुरुवात करणार असल्यामुळे तिची हजेरी अपेक्षित आहे.
View this post on Instagram
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2022 11:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

