IPL 2022: ‘या’ अनकॅप्ड धुरंधरांनी आपल्या कामगिरीने हंगामात आणली रंगत, येथे पहा संपूर्ण यादी

पण या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. यात केवळ भारताचेच नाही तर परदेशातील खेळाडूंचाही यात समावेश आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते अनकॅप्ड खेळाडू, ज्यांनी आपल्या कामगिरीने या हंगामात रंगत आणली.

मोहसीन खान, तिलक वर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 चा हंगाम आता लवकरच निरोप घेणार आहे. या स्पर्धेला या मोसमाचा विजेता लवकरच मिळणार आहे. पण या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांचीच नव्हे तर लाखो चाहत्यांचीही मने जिंकली आहेत. यात केवळ भारताचेच नाही तर परदेशातील खेळाडूंचाही यात समावेश आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते अनकॅप्ड खेळाडू (Uncapped Players), ज्यांनी आपल्या कामगिरीने या हंगामात रंगत आणली. (IPL 2022 Eliminator: बेंगलोरकडून अनपेक्षित संधीनंतर आपले लग्न पुढे ढकलले, आता एलिमिनेटरचा ‘हिरो’ बनत लखनौचे स्वप्न केले चक्काचूर)

उमरान मलिक (Umran Malik)

आयपीएल (IPL) 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणारा जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरानने या हंगामात चमकदार कामगिरीने भारतीय संघात स्थान मिळवले. मलिकने आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांमध्ये घातक गोलंदाजी करत 22 विकेट घेतल्या. या दरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 9.03 होत तर स्ट्राइक रेट 13.57 राहिला. या शानदार कामगिरीनंतर आता उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पणची संधी मिळाली आहे.

मोहसीन खान (Mohsin Khan)

लखनऊचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या गोलंदाजानेही आपल्या अचूक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. हा खेळाडूही टीम इंडियामध्ये संधीचा दावेदार आहे. मोहसीन खानने आयपीएलच्या या हंगामात 9 सामन्यांमध्ये खतरनाक गोलंदाजी करताना 14 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे.

तिलक वर्मा (Tilak Varma)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलेल्या तिलकने या मोसमात खेळताना चांगली कामगिरी बजावली, ज्यानंतर त्यांच्या सुनील गावसकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मुंबईचा संघ प्लेऑफ शर्यतीतून लवकर बाहेर पडला तरी संघाला चांगल्या भागीदारीची गरज असताना या फलंदाजाने मुंबईसाठी अशा अनेक लक्षवेधी डाव खेळले. या मोसमात मुंबईकडून खेळताना त्याने 14 सामन्यांत 36.09 च्या सरासरीने 397 धावा केल्या.

रिंकू सिंह (Rinku Singh)

भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून सहाव्या क्रमांकावर फलंदाजांच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत रिंकू सिंह ही पोकळी भरून काढू शकते. या हंगामात उत्तर प्रदेशच्या या खेळाडूने कोलकताकडून खेळताना सर्वांना प्रभावित केले आहे. रिंकूने अशीच कामगिरी करत राहिल्यास लवकरच तो भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो.