IPL 2022: ‘ही’ आयपीएल फ्रँचायझी एकही खेळाडू रिटेन करणार नाही, लिलावात पुन्हा नव्याने करणार संघ बांधणी; कॅप्टनने ही केला रामराम

सध्याच्या आठही संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेंशन यादी प्रस्तुत करण्यास सांगण्यात आले आहे. अंतिम मुदत जवळ आल्याने सर्व संघ विचारमंथनात व्यस्त असतील. तथापि, पंजाब किंग्जच्या मालकांनी पुन्हा नव्याने संघ बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझींच्या रिटेन केलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएलच्या (IPL) रिटेन होऊ शकत असलेल्या खेळाडूंबद्दल आतापर्यंत बरेच अटकळ बांधले जात आहे मात्र आतापर्यंत अधिकृत पुष्टी झालेली नाही. प्रत्येक फ्रँचायझीला जास्तीत जास्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी आहे. यादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्स (Punjab Kings) त्यांच्या कोणत्याही खेळाडूला रिटेन (IPL Retention) करणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या आठही संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेंशन यादी प्रस्तुत करण्यास सांगण्यात आले आहे. अंतिम मुदत जवळ आल्याने सर्व संघ विचारमंथनात व्यस्त असतील. तथापि, पंजाब किंग्जच्या मालकांनी पुन्हा नव्याने संघ बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. (IPL 2022: मेगा लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझी ‘या’ खेळाडूंना करू शकते रिटेन, पहा कोणता संघ कोणत्या खेळाडूंवर लावू शकतो दाव)

यासह बोललीवूडची अभिनेत्री प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) सहमालकीचा पंजाब संघ संपूर्ण 90 कोटींच्या पर्ससह लिलावात उतरेल. उल्लेखनीय म्हणजे मागील दोन मोसमात संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुल देखील संघाची साथ सोडणार असल्याचे यापूर्वी कळवले होते. प्रीती झिंटाच्या सह-मालकीच्या बाजूला राहुल नक्कीच आपल्या सोबत हवा होता, परंतु ते त्यांच्या इतर कोणत्याही खेळाडूसह पुढे जाण्यास उत्सुक नाहीत. विशेष म्हणजे, 2018 मध्ये फ्रँचायझीत सामील झाल्यापासून राहुलने पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने PBKS साठी चारपैकी तीन हंगामात 600 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 2019 हा एकमेव सीझन होता जिथे तो हा टप्पा ओलांडू शकला नव्हता आणि त्याने 593 धावा केल्या. त्याने 2020 मध्ये ऑरेंज कॅप देखील पटकावली होती. तथापि, 29 वर्षीय खेळाडूने संघ बदलण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे PBKS ने पूर्णपणे नवीन संघ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच पुढील वर्षांपासून दोन नवीन संघ - अनुक्रमे अहमदाबाद आणि लखनौ - देखील आपला दम दाखवतील. विद्यमान संघांनी कायम न ठेवलेल्या खेळाडूंच्या यादीतून जास्तीत जास्त तीन खेळाडू निवडण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणून जर राहुल पंजाबशी विभक्त झाला, तर दोन्ही फ्रँचायझींमध्ये त्याला ताफ्यात सामील करण्यासाठी चढाओढ पाहायला मिळू शकते. राहुल व्यतिरिक्त श्रेयस अय्यर, शिखर धवन, डेविड वॉर्नर, सूर्यकुमार यादव आणि मयंक अग्रवाल अशा इतर काही प्रमुख खेळाडूंना देखील त्यांच्या सध्याच्या संघांकडून कायम ठेवण्याची अपेक्षा कमीच आहे. त्यामुळे ते दोन नवीन संघाच्या प्राधान्यक्रमात असण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif