IPL 2022: लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझी संघाचे कर्णधार बनण्यासाठी ‘हे’ 4 आहेत मजबूत दावेदार, पहा संपूर्ण यादी

आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी 2 नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद आणि लखनौ आता या स्पर्धेतील 9 व्या आणि 10 व्या फ्रँचायझी बनल्या आहेत. अशा स्थितीत संघ मालकांवर सहभागी खेळाडूंना खरेदी करणे आणि कर्णधाराची निवड करण्याची मोठी जबाबदारी आहे व हे काम सोपे नाही. यासाठी चार खेळाडू मुख्य दावेदार असू शकतात.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 मेगा लिलावापूर्वी 2 नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनौ (Lucknow) आता या स्पर्धेतील 9 व्या आणि 10 व्या फ्रँचायझी बनल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) आयोजित केला जाणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत संघ मालकांवर सहभागी खेळाडूंना खरेदी करणे आणि कर्णधाराची निवड करण्याची मोठी जबाबदारी आहे व हे काम सोपे नाही. RP-SG ग्रुपने लखनौ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे आणि CVC कॅपिटलने अहमदाबाद संघासाठी 5166 कोटी रुपयांना किंमत मोजली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल (IPL) स्पर्धेत प्रत्येक संघात मोठे बदल होणार आहेत. संघांना लिलावापूर्वी प्रत्येकी 3 ते 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. या दोन्ही फ्रँचायझींपुढे कर्णधार निवडण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यासाठी चार खेळाडू मुख्य दावेदार असू शकतात. (IPL 2022 Retention Rules: आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझी किती खेळाडूंना करू शकते रिटेन, नवीन नियमावली उघड)

1. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे, परंतु या संघात असताना त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक संधी मिळाली नाही. त्यामुळे जर तो लिलावात उतरला तर लखनऊ फ्रँचायझी फक्त त्याला खरेदीच नाही करणार तर कर्णधारपदही सोपवू शकते. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्व केले आहे. आयपीएलमध्ये त्यासाई विजयाची टक्केवारी 59.52 इतकी आहे. विशेष म्हणजे स्मिथने पुणे संघाला अंतिम फेरीत नेले होते, तेव्हा या संघाचे मालक संजीव गोयंका होते आणि आता त्यांनी लखनौचा संघही विकत घेतला आहे.

2. सुरेश रैना (Suresh Raina)

चेन्नई सुपर किंग्जच्या सर्वात दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनाला आगामी दोनपैकी एका संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. रैनाला आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याला लखनौचा कर्णधार बनवल्यास तो या संघाला पुढे नेऊ शकतो. रैनाने यापूर्वी आयपीएल 2016 मध्ये गुजरात लायन्स संघाचे नेतृत्व केले होते. आणि संघाने पॉईंट टेबलमध्ये तिसरे स्थान मिळवून प्ले-ऑफ गाठले होते.

3. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

श्रेयस अय्यर पुढील वर्षी दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसू शकतो कारण तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सु आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी रिषभ पंतला कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या मूडमध्ये आहे.अशा परिस्थितीत अय्यर लिलावात उतरला, तर हे दोन संघ त्याच्यावर दाव लावण्याचा विचार करू शकतात. अय्यरने 2020 मध्ये पहिल्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत संघाचे नेतृत्व केले होते.

4. डेविड वॉर्नर (David Warner) 

सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वॉर्नरच्या लिलाव प्रक्रियेत उतरण्याची शक्यता अधिक दिसत आहे. अशा स्थितीत लखनौ किंवा अहमदाबाद संघ त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा विचार करू शकतो. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 41.59 च्या सरासरीने आणि सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 5449 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतके आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये एसआरएच संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यामुळे वॉर्नरला त्याचा फटका सहन करावा लागला. प्रथम त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि नंतर त्याला सतत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले. आणि आता ऑस्ट्रेलियन स्टारला नव्याने सुरुवात करायची आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement