IPL 2022 Playoffs Scenario: आयपीएलच्या दोन सर्वात यशस्वी संघांचा फ्लॉप शो; प्लेऑफसाठी 4 संघ जवळपास निश्चित, IPL मध्ये दुसऱ्यांदाच असे घडले

आयपीएल 2022 मधील प्लेऑफसाठीची लढत रंजक होत आहे. सध्या गुजरात टायटन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. इतर संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे काही संघ प्लेऑफच्या अगदी जवळ असून काहींची स्थिती बिकट झाली आहे

रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

IPL 2022 Playoffs Scenario: आयपीएल प्लेऑफ (IPL Playoffs) शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पाच गडी राखून पराभव करत त्यांच्या गोलंदाजांच्या घातक कामगिरीच्या जोरावर त्यांचा स्पर्धेतून खेळ खराब केला. मुंबईने चेन्नईला 16 षटकांत अवघ्या 97 धावांत गुंडाळले आणि त्यानंतर 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून स्पर्धेतील तिसरा विजय खिशात घातला. गुणतालिकेत नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असलेल्या संघांमधील या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) स्पर्धेत टिकून राहण्याची थोडीशी आशा संपुष्टात आली. यासह, दोन सर्वात यशस्वी आयपीएल (IPL) संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत आणि आता उर्वरित सामने खेळून इतर संघांचा खेळ खराब करण्यासाठी मैदानात उतरतील. लक्षणीय आहे की इतिहासात दुसऱ्यांदा MI किंवा CSK पैकी कोणीही आयपीएल हंगामाच्या प्लेऑफ खेळताना दिसणार नाही. (IPL 2022 CSK vs MI: ‘हम तो डूबे हैं सनम, तुमको भी...’ रोमांचक सामन्यात मुंबईने चेन्नईला 5 विकेट्सने लोळवलं, PlayOff शर्यतीत सुपर किंग्सचा ‘गेम ओव्हर’!)

आयपीएल 2022 मधील प्लेऑफसाठीची लढत रंजक होत आहे. सध्या गुजरात टायटन्स संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. इतर संघ प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे काही संघ प्लेऑफच्या अगदी जवळ असून काहींची स्थिती बिकट झाली आहे. याशिवाय मुंबई आणि चेन्नईनंतर केकेआरचे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे. हा संघ दोन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरला आहे. आयपीएलचे एकपेक्षा जास्त जेतेपद जिंकण्यात मुंबई इंडियन्स आणि सीएसकेनंतर फक्त केकेआरचा क्रमांक लागतो. गुजरात टायटन्स याशिवाय गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर धावणारा संघ लखनऊ सुपर जॉइंट्स विराजमान आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील हा संघही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. लखनौला प्लेऑफ प्रवेश निश्चित करण्यासाठी आता एका विजयाची गरज आहे, पण काही कारणास्तव संघ एकही सामना जिंकू शकला नसला तरी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणे खूप कठीण आहे.

यानंतर प्लेऑफच्या लढतीत आघाडीवर असलेल्या संघांमध्ये राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सने पाचव्या क्रमांकावर आपले आव्हान कायम ठेवले आहे. या तीन संघांपैकी फक्त राजस्थान रॉयल्सने एकदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. उर्वरित दोन संघ आयपीएलच्या विजेतेपदापासून वंचित राहिले आहेत. म्हणजेच लखनौ, आरसीबी आणि दिल्लीने राजस्थानला हरवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला तर प्लेऑफमधील चार संघ असे असतील, ज्यापैकी कोणीही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही. त्यामुळे असे होणार की नाही हे पाहणे खूप मनोरंजक असेल. दुसरीकडे, या संघांशिवाय पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद देखील प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. मात्र, दोघांना आता आपले उर्वरित सामने मोठ्या फरकाने तर जिंकावे लागतीलच मात्र, अन्य संघाच्या कामगिरीवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.