IPL 2022, PBKS vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! यशस्वी जयस्वालची विस्फोटक फंलदाजी, शिमरॉन हेटमायरची दमदार फलंदाजी, पंजाबवर 6 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चा 52 वा लीग सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखून दोन सामन्यांची पराभवाची मालिका संपुष्टात आणली. राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालने तुफान फलंदाजी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

IPL 2022, PBKS vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! यशस्वी जयस्वालची विस्फोटक फंलदाजी, शिमरॉन हेटमायरची दमदार फलंदाजी, पंजाबवर 6 विकेट्सने ‘रॉयल’ विजय
यशस्वी जयस्वाल (Photo Credit: PTI)

IPL 2022, PBKS vs RR: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 चा 52 वा लीग सामना पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यात राजस्थानने 6 गडी राखून दोन सामन्यांची पराभवाची मालिका संपुष्टात आणली. पंजाबने पहिले फलंदाजी करून 190 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात राजस्थानसाठी यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) तुफान फलंदाजी करून संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. यशस्वीने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्क्ल 31 धावा केल्या आणि शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) 31 धावा करून नाबाद राहिला. तसेच जोस बटलरने 30 आणि संजू सॅमसनने 28 धावांची छोटेखानी खेळी केली. यासह राजस्थानने प्ले ऑफच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली आहे. (IPL 2022 सीझनमध्ये दोन फलंदाजांनी ठोकले 5 शतके, ‘या’ स्टार भारतीय खेळाडूच्या बॅटमधून निघाले आहेत सर्वात ‘फास्ट हंड्रेड’)

दुसरीकडे, जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक जितेश शर्मा आणि लियाम लिविंगस्टोनच्या शानदार खेळीनंतर गोलंदाजांनी पंजाबला विजय मिळवून देण्यासाठी पूर्ण जोर लावला मात्र, जयस्वालच्या तुफानी फलंदाजीपुढे त्यांच्या पदरी पराभवाची निराशा आली. पंजाबसाठी अर्शदीप सिंहने तर कगिसो रबाडा आणि ऋषी धवनने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. वानखेडे स्टेडियमवर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जोस बटलर आणि जयस्वालच्या सलामी जोडीने राजस्थानला प्रभावी सुरुवात करून दिली. तथापि बटलर आणि सॅमसन नियमित अंतराने बाद झाल्याने मधल्या फळीवर दडपण आले. तथापि जयस्वालने पडिक्क्लच्या साथीने 56 धावांची भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. मोक्याच्या क्षणी यशस्वीला बाद करून अर्षदिपने संघाला मोठा दिलासा मिळवून दिला पण हेटमायरच्या चेंडूत धावांच्या खेळीपुढे पंजाबचे गोलंदाज हतबल दिसले आणि संघाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे आता पंजाब किंग्सची प्लेऑफची वाट बिकट झाली आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने 47 धावांवर पहिली विकेट गमावली. शिखर धवन 12 धावा करून बाद झाला. भानुका राजपक्षे 27 धावा करून राजस्थानचा दुसरा बळी ठरला. मयंक अग्रवाल 15 धावा करून स्वस्तात तंबूत परतला. पण बेअरस्टोने तग धरून फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकले. तथापि बेअरस्टो 56 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. लियाम लिविंगस्टोन 22 धावांवर बाद झाला, मात्र जितेश शर्मा 18 चेंडूत 38 धावांची नाबाद खेळी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. राजस्थानसाठी युजवेंद्र चहलने तीन विकेट घेतल्या.

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).