IPL 2022: आयपीएलमध्ये केवळ 5 भारतीयांनी केलीय ‘ही’ करामात, सर्वाधिक वेळी परदेशी खेळाडूंनी केलाय कहर; वाचा सविस्तर
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलरने शानदार फलंदाजी केली आहे आणि त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. बटलर यंदा ऑरेंज कॅपचा मुख्य दावेदार बनला आहेत. लक्षणीय गोष्ट म्हणजे याआधीच्या 15 आवृत्त्यांपैकी केवळ 5 वेळा भारतीय फलंदाजांना या, ऑरेंज कॅपचा मान मिळाला आहे.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात आतापर्यंत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) स्टार सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) शानदार फलंदाजी केली आहे आणि त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. बटलरने आतापर्यंत 8 सामन्यात सर्वाधिक 499 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतके आणि तीन शतके ठोकली आहे. तसेच यादरम्यान त्याचा स्ट्राईक-रेट 159.42 राहिला आहे. परिस्थितीत बटलर यंदा ऑरेंज कॅपचा मुख्य दावेदार बनला आहेत. लक्षणीय गोष्ट म्हणजे याआधीच्या 15 आवृत्त्यांपैकी केवळ 5 वेळा भारतीय फलंदाजांना या, ऑरेंज कॅपचा मान मिळाला आहे. आयपीएलच्या एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) दिली जाते. गेल्या वर्षी ही कॅप चेन्नई सुपर किंग्जच्या रुतुराज गायकवाडने पटकावली होती. आयपीएलच्या (IPL) इतिहासात आतापर्यंत फक्त 5 भारतीय फलंदाजांना ऑरेंज कॅप मिळाली आहे आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यापासून सुरुवात झाली आहे. (IPL 2022: लिलावात ‘या’ 3 खेळाडूंकडे दुर्लक्ष करून मुंबई इंडियन्सचा डाव फसला, नाहीतर एवकी वाईट अवस्था कधीच झाली नसती)
आयपीएलच्या 2010 आवृत्तीत मुंबई इंडियन्सचे माजी दिग्गज सचिनने 15 सामन्यांमध्ये 47.53 च्या सरासरीने आणि 132.61 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 618 धावा केल्या व ऑरेंज कॅपचा मान मिळवला. तसेच सचिननंतर अनुक्रमे रॉबिन उथप्पा, विराट कोहली, केएल राहुल, रुतुराज गायकवाड यांनी देखील ऑरेंज कॅप मिळवली आहे. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी आयपीएल 2016 हे सुवर्ण वर्ष ठरले. ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोहलीने पाच वर्षापूर्वी 16 सामन्यांमध्ये 81.08 च्या सरासरीने आणि 152.03 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 973 धावा ठोकल्या होत्या. तसेच त्याने यादरम्यान 4 शतके देखील झळकावली. मात्र, अंतिम फेरीत बंगळुरूला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला.
दुसरीकडे, सर्वात कमी वयात रुतुराज गायकवाडने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ऑरेंज कॅप पटकावली होती. ऑरेंज कॅप जिंकणारा तो पहिला अनकॅप्ड फलंदाज आहे. उल्लेखनीय आहे की आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर तीन ऑरेंज कॅप जिंकणारा एकमात्र फलंदाज आहेत. तसेच 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा विद्यमान कर्णधार केन विल्यमसन याने देखील ऑरेंज कॅप पटकावली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)