IPL Auction 2025 Live

IPL 2022: RCB ने कॅप्टनशिपचा विचार करुन Faf du Plessis वर बोली लावली का? फ्रँचायझी डायरेक्टरने निर्णयामागील खरे कारण केले उघड

आरसीबी फ्रँचायझीच्या कर्णधारपदी कोहलीच्या जागी डु प्लेसिसची निवड करण्यात आली असून कोहलीने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

फाफ डु प्लेसिस (Photo Credits: Getty Images)

आयपीएल (IPL) 2021 हंगामानंतर विराट कोहली (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार म्हणून पायउतार झाल्यावर फ्रँचायझी संघाचा पुढचा कर्णधार कोण होणार, याविषयी तर्क-वितर्क सुरु झाले होते. आणि अखेर 12 मार्च रोजी फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) याची RCB ने कर्णधार म्हणून घोषणा केली. आरसीबीचा (RCB) कर्णधार म्हणून अंतिम हंगामात फ्रँचायझीचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात कोहलीला अपयशी ठरला. फ्रँचायझीने 2021 आवृत्तीच्या प्लेऑफ फेरीत प्रवेश केला जो RCB चा कर्णधार म्हणून कोहलीचा अंतिम हंगाम ठरला. कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले असले तरी लीगच्या 15 व्या हंगामात बंगळुरूने रिटेन तो पहिला मार्की खेळाडू होता. बंगळुरूने मेगामहा लिलावापूर्वी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनाही कायम ठेवले. (IPL 2022: फाफ डु प्लेसिस RCB चा नवीन कर्णधार बनल्यानंतर Virat Kohli याची पहिली प्रतिक्रिया, पहा काय म्हणाला माजी कर्णधार)

शनिवारी आरसीबीने अनुभवी सलामीवीर डु प्लेसिसची फ्रँचायझीचा नवीन कर्णधार म्हणून नियुक्तीची पुष्टी केली. दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज सलामीवीराने कोहलीकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर RCB चे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी स्पष्ट केले आहे की बंगळुरू फ्रँचायझीने भारतीय रनमशीनचा उत्तराधिकारी म्हणून डू प्लेसिसला का निवडले? तसेच कॅप्टनशिपचा विचार करुन डु प्लेसिसवर लिलावात बोली लावली का? या प्रश्नावर माइक हेसन यांनी तो सुद्धा विचार डोक्यात होता, असं उत्तर दिलं. ““फाफ डू प्लेसिसला विकत घेताना फलंदाजी बरोबर कॅप्टनशिपचा विचारही आमच्या डोक्यात होता. आमच्याकडे विराट आणि मॅक्सवेल दोघेही आहेत, ज्यांच्याकडे कॅप्टनशिपचा दीर्घ अनुभव आहे. नेतृत्व क्षमतेचा विस्तार हा सुद्धा आम्ही विचार केला,” हेसन म्हणाले. RCB ने आयपीएल लिलावात डु प्लेसिसला 7 कोटींमध्ये खरेदी केले.

गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएल संघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये परदेशी खेळाडूंना नेतृत्वाची जबाबदारी देण्यास टाळले आहे. पण जगातील सर्वात श्रीमंत लीगच्या 15 व्या हंगामातील प्रत्येक सामना खेळण्यासाठी डु प्लेसिस पुरेसा चांगला आहे असे हेसनने सांगितले. आयपीएलच्या नियमानुसार एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळू शकतात. अशा परिस्थितीत आता डु प्लेसिसच्या हाती संघाची कमान आल्यामुळे एक जागा कायमची भरली गेली आहे.