IPL 2022 Mega Auction: कधी होणार आयपीएलचा मेगा लिलाव, रिटेन्शन नियमांपासून कोणत्या संघाकडे अधिक पैसे; जाणून घ्या

आयपीएलचा मेगा लिलाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाईल असे मानले जात आहे. यंदाचा लिलाव मोठा असेल, त्यामुळे लिलावाशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. IPL 2022 मेगा लिलावापूर्वी या सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मेगा लिलावाला आता फक्त एक महिना शिल्लक आहे. आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जाईल असे मानले जात आहे. यंदाचा लिलाव मोठा असेल, त्यामुळे लिलावाशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पुढील वर्षांपासून 8 ऐवजी 10 संघ आयपीएल (IPL) खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. अलीकडेच बीसीसीआयने (BCCI) दोन नवीन संघांचा लिलाव केला होता. यामध्ये लखनौ (Lucknow) आणि अहमदाबाद (Ahmedabad) फ्रँचायझीने बाजी मारली. 2018 च्या मेगा लिलावात संघांकडे 80 कोटी रुपये होते, त्यापैकी ते रिटेन केलेल्या खेळाडूंवर जास्तीत जास्त 33 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र यंदा ही रक्कम 10 कोटींनी वाढवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक खेळाडूला आयपीएलच्या लिलाव पूलमध्ये (IPL Auction Pool) उतरायचे आहे आहे की नाही हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. IPL 2022 मेगा लिलावापूर्वी जाणून घ्या या सर्व महत्त्वाच्या गोष्टी: (IPL 2022 Retention: चेन्नई सुपर किंग्ज ‘या’ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकते, ‘या’ परदेशी खेळाडूलाही मिळणार जागा तर ‘चॅम्पियन’ अष्टपैलूला दाखवणार रस्ता)

- संघांकडील वेतन कॅप - 90 कोटी

- जुनी फ्रँचायझी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करेल. तर अद्याप जरी अधिकृतपणे सांगितले गेले नसले तरी प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवाग्नी असेल.

- नवीन फ्रँचायझी: 2 नवीन संघ 1 डिसेंबर 2021 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान लिलावात उतरलेल्या तीन खेळाडूंची निवडू शकतात. यामध्ये दोन भारतीय आणि एका विदेशी खेळाडूचा समावेश केला जाऊ शकतो.

-RTM कार्ड: यावेळी राईट टू मॅच (RTM) कार्ड नसेल.

एकूण खेळाडूंची पर्स - 90 कोटी

- 4 खेळाडूंना कायम ठेवल्यास संघाच्या पर्समधून 42 कोटी रुपये कापले जातील.

- 3 रिटेनशनमधून 33 कोटी रुपयांची कपात होईल.

- 2 रिटेन्शनमुळे टीमच्या पर्समधून 24 कोटी कपात होतील.

- 1 कायम ठेवलेला खेळाडू: पर्समधून 14 कोटी रुपये कापले जातील.

दरम्यान, फ्रँचायझींनी अद्याप रिटेन केलेल्या खेळाडूंची अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. अंतिम निर्णाय घेण्यासाठी त्यांच्याकडे अजून पाच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लवकरच चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघाची स्थिती समजू शकेल. एमएस धोनी पुढील तीन हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्ससोबत राहणार तर केएल राहुल (पंजाब किंग्स), आर अश्विन आणि श्रेयस अय्यर दिल्ली फ्रँचायझीची साथ सोडणार आल्याचे समजले जात आहे. मात्र अंतिम चित्र लवकरच स्पधत होईल.