IPL 2022 Mega Auction: देश-विदेशातील 590 खेळाडू लिलावाच्या रिंगणात, पण कोणत्या फ्रँचायझीकडे किती जागा बाकी? किती आहे त्यांचे बजेट? जाणून घ्या

येतील. 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे होणाऱ्या लिलावासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंजाब किंग्स (PBKS) 72 कोटी रुपयांच्या सर्वोच्च बजेटसह मेगा लिलावात उतरणार आहे. आता कायम रिटेन्शननंतर सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये शिल्लक असलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 लिलावात 10 संघ देश-दिवेशातील खेळाडूंना ताफ्यात सामील करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील. येतील. 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरू (Bangalore) येथे होणाऱ्या लिलावासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संघ मालक आणि लिलावाशी संबंधित इतर लोकही बेंगळुरूला पोहोचले आहेत. आयपीएल 2022 लिलावापूर्वी (IPL Auction) अनेक संघांनी त्यांच्या स्तरावर मॉक ऑक्शन केले आहेत म्हणजेच कोणता खेळाडू इतका महागात जाऊ शकतो, कोणाला मागणी असेल आणि कोणाला नाही हे माहित आहे. लिलावापूर्वीच जवळपास 33 खेळाडू संघांचा भाग बनले आहेत. हे खेळाडू रिटेन्शनद्वारे संघाशी संबंधित आहेत. आयपीएल (IPL) 2022 च्या लिलावात एकूण 590 खेळाडूंचा सहभाग असेल पण प्रश्न असा आहे की कोणत्या संघात किती खेळाडूंची जागा रिकामी आहे? (IPL 2022 Mega Auction: आयपीएलच्या ‘या’ विक्रमी गोलंदाजावर फ्रँचायझी लावतील मोठी बोली; रोहित शर्मा, विराट कोहली पण याच्या समोर नाही टिकले)

अनेक संघ कर्णधाराच्या शोधात असून त्यांच्यासाठी हा लिलाव महत्त्वाचा असेल. पंजाब किंग्स (Punjab Kings) 72 कोटी रुपयांच्या सर्वोच्च बजेटसह मेगा लिलावात उतरणार आहे. तर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडे सर्वात कमी 47.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. सर्व 10 संघांना 90 कोटींचे बजेट देण्यात आले आहे, ज्यामध्ये ते त्यांच्या संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू जोडू शकतात. काही संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंना निश्चित स्लॅबपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. लखनोने केएल राहुलला 17 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे. आता कायम रिटेन्शननंतर सर्व फ्रँचायझींच्या पर्समध्ये शिल्लक असलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे.

पंजाब किंग्स - 72 कोटी रुपये

सनरायझर्स हैदराबाद - 68 कोटी रुपये

राजस्थान रॉयल्स - 62 कोटी रुपये

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - 57 कोटी रुपये

मुंबई इंडियन्स - 48 कोटी रुपये

चेन्नई सुपर किंग्ज - 48 कोटी रुपये

कोलकाता नाईट रायडर्स - 48 कोटी रुपये

दिल्ली कॅपिटल्स - 47.5 कोटी रुपये

लखनौ सुपर जायंट्स - 59.8 कोटी रुपये

गुजरात टायटन्स - 52 कोटी रुपये

संघांकडे किती खेळाडूंची जागा शिल्लक

- पंजाब किंग्स: बॉलीवूड स्टार प्रीती झिंटाच्या सहमालकीचा संघ 23 खेळाडू खरेदी करू शकते ज्यामध्ये 8 परदेशी खेळाडू असू शकतात.

- सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि अहमदाबाद संघ 22 खेळाडू जोडू शकतात, ज्यामध्ये जास्तीत जास्त सात परदेशी खेळाडूंचाही समावेश असू शकतो.

- मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जला फक्त 21 खेळाडू निवडण्याची संधी आहे. तिच्या चार खेळाडूंमध्ये केवळ एका परदेशी खेळाडूचा समावेश असला तरी ती कमाल सात विदेशी खेळाडूंचाही समावेश करू शकते.

- KKR आपल्या 21 खेळाडूंमधून फक्त सहा परदेशी खेळाडू निवडू शकतो.