IPL 2022: नव्या संघात ‘या’ 5 खेळाडूंची कामगिरी दमदार, जुने फ्रँचायझी पश्चातापात थंडगार, घ्या जाणून

आज ब्रेबर्न स्टेडियमवर आता गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आपली जुनी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अशा पाच खेळाडूंवर एक नजर टाकू ज्यांनी फ्रँचायझी बदलली आणि माजी संघांवर हल्लाबोल केला.

शिवम दुबे, राशिद खान व कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, MI vs GT: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझींनी 2022 सीझनच्या तयारीसाठी मेगा लिलावादरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले. लिलावात बरीच हालचाल झाली आणि काही प्रमुख खेळाडूंनी मुख्यतः गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) मध्ये प्रवेश केला. केएल राहुल लखनौचा कर्णधार बनला तर एकावेळी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार अष्टपैलू असलेला हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) हाती गुजरात संघाची कमान देण्यात आली. आयपीएलमध्ये यंदा असे अनेक सामने पाहायला मिळाले आहेत ज्यामध्ये नवीन संघांकडून खेळत क्रिकेटपटूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि मुख्यतः आपल्या जुन्या फ्रँचायझींची धुलाई केली. आज मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर आता गुजरातचा कर्णधार हार्दिक आपली जुनी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सविरुद्ध मैदानात उतरणार आहे. याच पार्श्वभूमीवर अशा पाच खेळाडूंवर एक नजर टाकू ज्यांनी फ्रँचायझी बदलली आणि माजी संघांवर हल्लाबोल केला. (IPL 2022, DC vs SRH Match 50: David Warner याची ताबडतोड फलंदाजी, सनरायझर्स गोलंदाजांवर हल्ला चढवत ठोकले खणखणीत अर्धशतक)

1. कुलदीप यादव (Kuldeep Yadav)

कुलदीप यादवने त्याच्या माजी फ्रेंचायझी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) द्वारे बाहेर केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) कडून मोठी छाप पाडली आहे. कुलदीपने कॅपिटल्ससाठी 9 सामन्यांत 17 बळी घेतले आहेत, ज्यात दोनदा चार विकेट्सचा समावेश आहे. आणि लक्षणीय म्हणजे त्याने दोन्ही 4-fer केकेआरविरुद्ध घेतले आहेत. KKR विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कुलदीप 4/35 आकडेवारीची नोंद केली. आणि 216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरला 171 धावांत गुंडाळत दिल्लीला 44 धावांनी विजय मिळवून दिला. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवरील दुसऱ्या सामन्यात फिरकीपटूने तीन षटकात 4/14 अशी आकडेवारी नोंदवली.

2. कृणाल पांड्या (Krunal Pandya)

क्रुणालला मेगा लिलावादरम्यान लखनौ सुपर जायंट्सने (एलएसजी) खरेदी होते आणि अष्टपैलू खेळाडूने संघासाठी एक मौल्यवान खेळाडू म्हणून समोर आला आहे. क्रुणालने त्याच्या पूर्वीच्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध दोन सामने खेळले आहेत आणि विशेषत: दुसऱ्या सामन्यात प्रशंसनीय कामगिरी केली आहे. दोन्ही संघांची पहिली भेट ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाली, जिथे डावखुरा अष्टपैलू दोन षटकात 16 धावा देऊन एकही विकेट घेऊ शकला नाही आणि एका धावेवर नाबाद राहिला. तथापि, दुसऱ्या सामन्यात क्रुणालने चार षटकांत 19 धावांत तीन बळी घेत जोरदार पुनरागमन केले. उल्लखनीय आहे की लखनौने हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले.

3. डेविड वॉर्नर (David Warner)

दिल्ली कॅपिटल्सचा धाकड सलामीवीर डेविड वॉर्नरने नुकतंच या यादीत आपला दावा ठोकला आहे. आयपीएलचा 50 वा सामना वॉर्नर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा चांगलाच गाजला. गेल्या वर्षी SRH फ्रँचायझीने वॉर्नरची पहिले कर्णधार आणि नंतर खेळाडू म्हणून प्लेइंग इलेव्हनमधून हकालपट्टी केली. यानंतर फ्रँचायझीने वॉर्नरला यंदाच्या हंगामासाठी रिटेनही केले नाही. यानंतर वॉर्नर पुन्हा दिल्लीच्या ताफ्यात परतला. आणि आपल्या जुन्या फ्रँचायझीसमोर खेळत अनुभवी ओपनरने धावांचा डोंगर उभारला, ज्यामुळे दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी धुव्वा उडवला.

4. शिवम दुबे (Shivam Dube)

शिवम दुबे 2019 आणि 2020 हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाचा भाग होता. आरसीबीने रिलीज केल्यातर त्याला गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने खरेदी केले होते. मात्र, लिलावापूर्वी बाहेर केले आणि चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मेगा लिलावात करारबद्ध केले. आयपीएल 2022 च्या 22 व्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूने RCB विरुद्ध 46 चेंडूत शानदार नाबाद 95 धावा केल्या. आणि सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 216 धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात चेन्नईने हंगामातील पहिला विजय मिळवला आणि दुबेला सामनावीर ठरला.

5. राशिद खान (Rashid Khan)

स्टार अष्टपैलू राशिद खानला त्याच्या माजी संघ सनरायझर्स हैदराबादने बाहेर केल्यानंतर गुजरात टायटन्सने (GT) विकत घेतले आणि या खेळाडूने जवळजवळ प्रत्येक प्रसंगी आपली योग्यता सिद्ध केली आहे. 27 एप्रिल रोजी झालेल्या SRH विरुद्धच्या सामन्यात, राशिदने केवळ 11 चेंडूत 31 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात गुजरातला 22 धावांची गरज होती आणि राशिद खानने तीन षटकार मारून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.