IPL 2022: जेसन रॉय याने आयपीएलमधून पाय मागे खेचला, आता गुजरात टायटन्स ‘या’ 5 खेळाडूंचा पर्याय म्हणून विचार
अशा परिस्थितीत मार्टिन गप्टिलपासून जेम्स विन्सपर्यंत काही परदेशी सलामीवीर आहेत ज्यांना गुजरात टायटन्स रॉयच्या बदली म्हणून टार्गेट करू शकतात. रॉय आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी दुसऱ्या टप्प्यात खेळला होता.
Jason Roy IPL 2022 Replacement: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी तडाखेबाज इंग्लंड फलंदाज जेसन रॉयने (Jason Roy) पाय मागे घेतल्यामुळे नवोदित गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघ अडचणीत सापडला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावामधील (IPL Mega Auction) काही निर्णयांमुळे फ्रँचायझीवर आधीच टीका करण्यात अली होती आणि आता, हंगाम सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्यांचा सर्वोत्तम खरेदीपैकी एक खेळाडूला बदलण्यास त्यांना भाग पडले आहे. बायो-बबल थकव्यामुळे आयपीएल (IPL) 2022 सीझनमधून माघार घेणाऱ्या रॉयला हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने त्याच्या मूळ 2 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण आता तो बाहेर पडल्याव फ्रँचायझीकडे ओपनिंग फलंदाजासाठी परदेशी खेळाडूंच्या यादीत मर्यादित पर्याय शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत आयपीएल लिलावात खरेदीदार आकर्षित करण्यात अपयशी ठरलेले काही अन्य स्टार खेळाडूंचा फ्रँचायझी बदली म्हणून विचार करू शकते. (IPL 2022: गुजरात टायटन्सला मोठा झटका, इंग्लंडचा स्टायलिश फलंदाज जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय)
1. मार्टिन गप्टिल
न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज लिलावात 75 लाखाच्या मूळ किमतीत उपलब्ध होता, पण त्याच्यात कोणत्याही फ्रँचायझीने स्वारस्य दाखवले नाही. अनुभवी फलंदाज टी -20 लीगमध्ये सातत्यपूर्ण खेळ करू शकलेला नाही परंतु खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याची आक्रमक शैली असो किंवा टी-20 क्रिकेटमधील अनेक वर्षांचा अनुभव, गप्टिलकडे गुजरात टायटन्स संघात फिट बसण्यासाठी आवश्यक पात्रता आहे.
2. ख्रिस लिन
आणखी एक T20 स्पेशालिस्ट फलंदाज ज्याने आपल्या आक्रमक खेळाच्या शैलीने गोलंदाजांना घाम फोडला आहे. 2018 मध्ये झालेल्या शेवटच्या आयपीएल लिलावात लिन हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीरने विसंगत कामगिरी केली असली तरी, टायटन्सला एक योग्य पर्याय ठरू शकतो.
3. पॉल स्टर्लिंग
परदेशी सलामी फलंदाजांचा विचार केला तर तो इतका प्रसिद्ध नाव नाही पण स्टर्लिंग टी-20 मध्ये एक सक्षम फलंदाज आहे. त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली, त्यामुळे तो गुजरात टायटन्सच्या विशलिस्टमध्ये असू शकतो. स्टर्लिंगच्या फलंदाजीची आक्रमक शैली शुभमन गिलला पूरक ठरू शकते.
4. कॉलिन मुनरो
मुनरो सलामी जागे सोबत मधल्या फळीत देखील खेळू शकतो. कॉलिन मुनरो गुजरात टायटन्स संघातील फक्त सलामीची समस्या सोडवणार नाही तर तो मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांचा बॅकअप बनू शकतो. तसेच गरज भासल्यास मुनरोला मध्यम गतीची काही षटके टाकण्यास पण सक्षम आहे.
5. जेम्स विन्स
देशांतर्गत T20 फॉर्मेटमध्ये इंग्लंडचा फलंदाजाने चांगला प्रभाव पाडला आहे, परंतु इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो अद्याप आपला दम दाखवू शकलेला नाही. त्याने खेळलेल्या जवळपास प्रत्येक टी-20 लीगमध्ये त्याने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे आणि तो नक्कीच आयपीएलमध्ये संधीचा दावेदार आहे.