IPL 2022 Closing Ceremony: आयपीएल समारोप समारंभात BCCI साजरी करणार स्वातंत्र्याची 75 वर्षे; रणवीर सिंह, AR रहमान लावणार बॉलीवूडचा तडका
स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, बोर्ड समारोप समारंभात भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि संगीत दिग्दर्शक ए आर रहमान हे कार्यक्रमात सामील होणार आहेत.
IPL 2022 Closing Ceremony: 4 वर्षानंतर प्रथमच BCCI टी-20 लीगचा अधिकृत समारोप करण्यासाठी इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) समारोप समारंभ आयोजित करणार आहे. 2018 मध्ये बीसीसीआयने (BCCI) शेवटचा उद्घाटन आणि समारोप समारंभ आयोजित केला होता. त्यांनतर, 2019 पासून वेगवेगळ्या कारणांमुळे कोणतेही उद्घाटन आणि समारोप समारंभ आयोजित झाले नाहीत. 2019 मध्ये बोर्डाने उद्घाटन समारंभासाठी बजेटमधील रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दान करण्याचा निर्णय घेतला. तर 2020, 2021 आणि 2022 मध्ये कोविड-19 संसर्गामुळे बोर्डाला उद्घाटन समारंभ आयोजित करण्यापासून रोखले. मात्र यंदा समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असला तरी. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. (IPL 2022 Closing Ceremony: 2019 नंतर प्रथमच होणार आयपीएलचा समारोप समारंभ, BCCI भव्य सोहळा आयोजित करण्याच्या तयारीत; वाचा सविस्तर)
स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार, बोर्ड समारोप समारंभात भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणार आहे. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि संगीत दिग्दर्शक ए आर रहमान हे कार्यक्रमात सामील होणार आहेत. अहमदाबाद येथे आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार बोर्ड भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करेल आणि या काळात भारतीय क्रिकेटचा प्रवासही दाखवेल. यासाठी तपशीलांवर काम केले जात असले तरी, BCCI भारतीय संघाच्या सर्व माजी कर्णधारांना समारोप समारंभासाठी आमंत्रित करण्याची योजना आखत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहेत. लक्षणीय आहे की बॉलीवूड अभिनेता रणवीरने अलीकडेच 6 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या लीग स्टेज सामन्यात हजेरी लावली होती. काही दिवसांनंतर, तो एका सामन्यासाठी हिंदी समालोचना पॅनेलचा भाग देखील बनला होता.
दुसरीकडे, टेबल-टॉपर्स गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरलेली एकमेव टीम तर लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे इतर संघही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचे अन्य दावेदार आहेत. याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीत असले तरी, दोन्ही संघांला त्यांचे उर्वरित सामने जिंकायचे आहेत आणि त्यांना अन्य संघाचे निकाल देखील बाजूने लागणे आवश्यक असेल. आयपीएल 2022 चा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.