IPL Auction 2021 Unsold Players: आरोन फिंच, मिच मॅकक्लेनघन यांच्या पदरी निराशा, पहा अनसोल्ड खेळाडूंची संपूर्ण यादी

झे रिचर्डसन आणि काईल जेमीसन सारख्या युवा खेळाडूंनी फ्रँचायझीकडून मोठी रक्कम आकर्षित केली, तर आयपीएल 2021 च्या लिलावात आरोन फिंच आणि मिचेल मॅक्लेनाघन यासारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले.

आरोन फिंच आणि मिचेल मॅक्लेनाघन (Photo Credit: Facebook, Instagram)

IPL Auction 2021 Unsold Players: आयपीएल लिलाव (IPL Auction) 2021 मध्ये एकूण 57 खेळाडूंवर तब्बल 1,45,30,00,000 रुपये खर्च करण्यात आले परंतु, चेन्नईत गुरुवारी बऱ्याच मोठ्या नावांना कोणतेही खरेदीदार सापडलेले नाहीत. झे रिचर्डसन, काईल जेमीसन आणि रिले मेरीडिथ यासारख्या युवा खेळाडूंनी फ्रँचायझीकडून मोठी रक्कम आकर्षित केली, तर आयपीएल (IPL) 2021 च्या लिलावात आरोन फिंच (Aaron Finch) आणि मिचेल मॅक्लेनाघन (Mitchell McClenaghan) यासारखे आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिले. आयपीएल 14 चा लिलाव चेन्नई येथे पार पडला. तीन वेळा आयपीएल विजेते चेन्नई सुपर किंग्सने सर्वांना चकित करत टीम इंडियाचा 'टेस्ट स्पेशलिस्ट' चेतेश्वर पुजाराला खरेदी केले. सीएसकेने पुजाराला त्याच्या बेस प्राईस 50 लाख रुपयात संघात समावेश केला. विशेष म्हणजे, 2014 नंतर एका आयपीएल फ्रँचायझीने पुजारासाठी बोली लगावली आहे. दरम्यान, पहा आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी. (Mumbai Indians IPL 2021 Squad: सहाव्या आयपीएल जेतेपदासाठी रोहित शर्माची पलटन सज्ज, पहा MI चा संपूर्ण संघ)

अ‍ॅलेक्स हेल्स, जेसन रॉय, एवीन लुईस, आरोन फिंच, हनुमा विहारी, ग्लेन फिलिप्स, अ‍ॅलेक्स कॅरी, कुसल परेरा, शेल्डन कॉटरेल, आदिल राशिद, राहुल शर्मा, ईश सोधी, कैस अहमद, हिमांशू राणा, गहलौत सिंह, अहित शेठ, हिम्मत सिंह, विष्णू सोलंक, आयुष बडोनी, विवेक संह, अवि बरोट, केदार देवधर, अंकित राजपूत, मुजतबा यूसुफ, कुलदीप सेन, तुषार देशपांडे, करणवीर सिंह, संदीप लमिछाने, एस मिधुन, तेजस बरोका, रोव्हमन पॉवेल, शॉन मार्शन, देवरॉन कॉनवे, डॅरेन ब्राव्हो, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, मार्टिन गप्टिल, गुरकीरत सिंह, मार्नस लाबूशेन, वरुण आरोन, ओशेन थॉमस, मोहित शर्मा, बिली स्टॅनलेक, मिचेल मॅकक्लेनघन, जेसन बेहरेन्डॉर्फ, नवीन उल-हक, करण शर्मा, केएल श्रीजित, बेन द्वारशुईस, जी पेरियासामी, थिसारा परेरा, बेन मॅकडर्मॉट, मॅथ्यू वेड, सीन एबॉट, सिद्धेश लाड, तजिंदर सिंह, प्रेरक मंकड, जोश इंग्लिश, सिमरजीत सिंह, Scott Kuggeleijn, वेन पार्नेल, रीस टोपली, क्रिस ग्रीन, इसुरू उदाना, जॉर्ज लिंडे, चैतन्य बिश्नोई, अजय देव गौ, Jack Wildermuth, हर्ष त्यागी, Gerald Coetzee, टिम डेव्हिड आणि प्रत्युष सिंह.

आयपीएल 2021 लिलावात दक्षिण आफ्रिकेचा क्रिस मॉरिस व भारताचा अनकॅपड प्लेअर कृष्णप्पा गौतम या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा झाली. मॉरिस आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला असून गौतम मोठी बोली आकर्षित करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला.



संबंधित बातम्या