IPL 2021 Replacement Players: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी ‘या’ 4 संघांनी बदली म्हणून 9 खेळाडूंचा केला समावेश, पहा कोण IN आणि कोण OUT
आतापर्यंत 4 फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडूंची बदली सापडली आहे. काही खेळाडूंना दुखापतीमुळे तर काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. आतापर्यंत खेळाडूंची बदली म्हणून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सामील झालेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.
IPL 2021 Players Replacement: 19 सप्टेंबरपासून यूएईमध्ये (UAE) सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) उर्वरित हंगामासाठी फ्रँचायझी बदली शोधत आहेत. आतापर्यंत 4 फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडूंची बदली सापडली आहे. काही खेळाडूंना दुखापतीमुळे तर काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. युएई येथे आयपीएल (IPL) 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला काही दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आणि उत्साह व रोमांचची वाढत जात आहे. 29 सामन्यांनंतर आयपीएलचा पूर्वार्ध स्थगित करण्यात आला, तर आयपीएलचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे होणार आहे. बरेच खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडले आहेत आणि रिक्त जागा भरण्यासाठी आयपीएल संघ वेगाने बदली खेळाडूंचा शोध घेत आहेत. आतापर्यंत खेळाडूंची बदली म्हणून आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सामील झालेल्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे. (IPL 2021 Points Table: आयपीएल 14 च्या युएई लेगची उत्सुकता, पाहा कोणता संघ प्ले-ऑफच्या वाटेवर)
नॅथन एलिस आणि आदिल रशीद (पंजाब किंग्ज)
झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडल्यामुळे पंजाब किंग्सला जोरदार धक्का बसला. पण आता त्यांची कमी 22 वर्षीय नॅथन एलिस (Nathan Ellis) आणि इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद (Adil Rashid) भरून काढतील. यूएईची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने आदिलला याचा सर्वाधिक फायदा होईल आणि तो पंजाब फ्रँचायझीसाठी मुख्य गोलंदाज ठरू शकतो.
वानिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
अॅडम झांपाच्या अनुपलब्धतेचा अर्थ असा होता की बेंगलोर फ्रँचायझीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूच्या समान खेळाडूचा शोध घ्यावा लागला. नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मर्यादित ओव्हरच्या मालिकेत त्यांनी अत्यंत प्रतिभावान अष्टपैलू आणि भारतीय फलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या वनिंदू हसरंगाचा (Wanindu Hasaranga) संघात समावेश केला आहे.
टिम साऊदी (कोलकाता नाईट रायडर्स)
पॅट कमिन्सने आयपीएलच्या उर्वरित टप्प्यातून माघार घेतली आणि म्हणूनच, केकेआर व्यवस्थापनाने किवी वेगवान गोलंदाज, टिम साउदीला (Tim Southee) उर्वरित हंगामासाठी करारबद्ध केले. साउदीने टी-20 लीगमध्ये 40 सामन्यांत एकूण 28 विकेट्स घेतल्या आहेत.
तबरेज शम्सी आणि ग्लेन फिलिप्स (राजस्थान रॉयल्स)
बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चरच्या अनुपलब्धतेनंतर, राजस्थान रॉयल्सची फ्रँचायझी बर्याच समस्यांना सामोरे जात होती. पण आता त्यांच्या समस्यांना हाताळण्यासाठी त्यांनी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) आणि तबरेज शम्सीचा (Tabraiz Shamsi) समावेश केला आहे. शम्सी हा अपरंपरागत गोलंदाज आहे आणि तो फलंदाजांवर सहजतेने दबाव आणू शकतो. दुसरीकडे, ग्लेन फिलिप्स पूर्ण सहजतेने फलंदाजी करू शकतो आणि स्टंपच्या मागे जोस बटलरची कमतरता भरून काढू शकतो.