IPL 2021, RCB vs SRH Live Streaming: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि थेट प्रसारण कुठे आणि कसे पहावे

बेंगलोर विरुद्ध हैदराबाद आयपीएल सामना अबु धाबीमध्ये संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल. भारतीय क्रिकेटप्रेमी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा रोमांचक सामना पाहू शकतात, तर सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्नी + हॉटस्टार अॅपवर पाहिले जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: File Image)

IPL 2021, RCB vs SRH Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात काट्याची टक्कर होणार आहे. बेंगलोर विरुद्ध हैदराबाद आयपीएल सामना अबु धाबीमध्ये (Abu Dhabi) संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाईल. आरसीबी 16 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादची या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली, ज्यामुळे ते खूप पूर्वी प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडले होते. हैदराबादने 12 सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत आणि गुणतालिकेत तळाशी बसलेले आहेत. भारतीय क्रिकेटप्रेमी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा रोमांचक सामना पाहू शकतात, तर सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्नी + हॉटस्टार अॅपवर पाहिले जाईल.

अबू धाबी येथील या सामन्यात RCB ची धुरा विराट कोहलीच्या (Virat Kohli) खांद्यावर आहे. तर केन विल्यमसन (Kane Williamson) हैदराबादचे नेतृत्व करत आहे. आयपीएल 2021 मध्ये एकूण 56 लीग सामने खेळले जाणार आहेत. यापैकी 51 सामने झाले असून यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20, चेन्नई सुपर किंग्ज 18 आणि रॉयल चॅलेंजर्स 16 गुणांसह प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हा सामना जिंकून आरसीबीची नजर गुणतालिकेत पहिल्या 2 मध्ये स्थान मिळवण्यावर असेल. असे केल्याने आरसीबीला अंतिम फेरीत जाण्याची एक अतिरिक्त संधी मिळेल. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादसाठी हा सन्मान वाचवण्याची लढाई असेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल क्रिश्चियन, जॉर्ज गार्टन, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, काईल जेमीसन, दुश्मंत चमीरा, सचिन बेबी, नवदीप सैनी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, वनिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, टिम डेविड आणि आकाश दीप.

सनरायझर्स हैदराबाद संघ: जेसन रॉय, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केन विल्यमसन (कॅप्टन), प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, डेविड वॉर्नर, केदार जाधव, मनीष पांडे, खलील अहमद, शाहबाज नदीम, मुजीब उर रहमान, श्रीवत्स गोस्वामी, मोहम्मद नबी, विराट सिंग, बेसिल थम्पी, जगदीशा सुचित आणि उमरान मलिक.