PBKS vs DC IPL 2021 Match 29: DC विरुद्ध सामन्यापूर्वी पंजाब किंग्सला बसला मोठा फटका, कर्णधार KL Rahul रुग्णालयात दाखल
कर्णधार केएल राहुलला एपेंडिक्स झाले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्याचे ऑपरेशनही केले जाईल. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या संदर्भात पंजाब फ्रँचायझीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
KL Rahul Hospitalised with Appendicitis: आयपीएल (IPL) 2021 मध्ये रविवार दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) सामन्यापूर्वी पंजाबसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) एपेंडिक्स झाले असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्याचे ऑपरेशनही केले जाईल. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या संदर्भात पंजाब फ्रँचायझीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीनुसार, “काल रात्री केएल राहुलने पोटदुखीची तक्रार केली होती. वेदना खूप जास्त होती, ज्यामुळे औषधांचा देखील त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही ज्यांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आजच्या आयपीएल डबल-हेडर सामन्यापूर्वी पंजाब संघासाठी ही मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केएल राहुल केवळ पंजाब संघाचा कर्णधारच नाही, तर एक महत्त्वाचा सदस्यही आहे. राहुलचा पंजाब संघातील सलामी साथीदार मयंक अग्रवाल दुखापतीमुळे शेवटचा सामना खेळू शकला नाहीत आणि संघात आपली जबाबदारी सांभाळू शकेल असा कोणताही मोठा खेळाडू सध्या उपलब्ध नाही आहे. तथापि, आगामी सामन्यात संघाचे नेतृत्व कोण करेल याबाबत पंजाब फ्रँचायझीने अद्याप याबाबत माहिती दिलेली नाही. केएल राहुल काही काळ विश्रांती दिली जाईल अशी सध्या अपेक्षित आहे. केएल राहुलची टेस्ट घेण्यात आली असून त्यात त्याचा परिशिष्ट (Appendix) असल्याचे निष्पन्न झाले. पुढे पंजाब किंग्सने सांगितले की, “ऑपरेशनच्या माध्यमातून परिशिष्टाचा आजार बरा होईल. ज्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” दरम्यान, आयपीएल 2021 च्या 26व्या सामन्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार राहुल सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मान राहुलकडे आहे.
दुसरीकडे, दिल्ली आणि पंजाब संघातील आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वीच्या मागील सामन्यात विजय मिळवला होता त्यामुळे दोघे आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. आयपीएलच्या या हंगामात पंजाबच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर ती निराशाजनक आहे. आतापर्यंत संघाच्या गोलंदाजांनी प्रभावित केले आहे परंतु, फलंदाज मात्र फारशी चांगली खेळी करु शकलेले नाहीत. पंजाबने आतापर्यंत सात सामन्यांपैकी तीनच सामन्यात विजय मिळवला आहे.