IPL 2021 Phase-2: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, UAE येथे आयपीएलच्या दुसर्‍या टप्प्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या उपलब्धतेवर मिळाला मोठा अपडेट

एका अहवालानुसार, बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू टी-20 लीगमध्ये भाग घेण्यासाठी उपलब्ध असतील

ग्लेन मॅक्सवेल आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

IPL 2021 Phase-2: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात कोरोना महामारीमुळे अनेक परदेशी खेळाडूंपासून वंचित राहणार असल्याच्या भीती दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) परदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मोठा दिलासा मिळाला आहे. एका अहवालानुसार, बरेच ऑस्ट्रेलियन खेळाडू टी-20 लीगमध्ये भाग घेण्यासाठी उपलब्ध असतील. ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे (Australia Cricket Team) व्यस्त वेळापत्रक असून ऑक्टोबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कपपूर्वी श्रीलंकेविरुद्ध मर्यादित ओव्हरची मालिका खेळणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 पुन्हा सुरु होईल तेव्हा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) आणि डॅनियल सॅम्स उपलब्ध असतील. (IPL 2021 Phase-2: इयन मॉर्गनच्या अनुपस्थितीत हे 3 खेळाडू बनू शकतात KKR चे कर्णधार, एक आहे टी-20 स्पेशलिस्ट)

दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने यापूर्वीच स्वत:ला टी-20 लीगसाठी अनुपलब्ध असल्याचे घोषित केले होते. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये खेळाडू आणि सहकर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बीसीसीआयने 4 मे रोजी आयपीएल 2021 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. टी -20 लीगच्या पहिल्या टप्प्यात काय घडले या याचा विचार करता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात विदेशी खेळाडूंच्या सहभागाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. आयपीएलचा दुसरा टप्पा आणि टी-20 विश्वचषक युएईमध्ये होणार असून परदेशी खेळाडूंच्या मनस्थितीत बदल होताना दिसत आहे. आयपीएल 2021 मध्ये परदेशी खेळाडूंना केवळ सर्वोत्कृष्टविरुद्ध स्वत:चा खेळ पाहण्याची संधीच देत नाही तर टी-20 विश्वचषक लक्षात ठेवून युएई परिस्थितीबद्दल देखील समजून घेण्याची संधी देईल.

आयपीएलचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून युएई येथे खेळले जाणार आहेत. दुसरीकडे, बीसीसीआय युएई आणि ओमान येथे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करेल. दुबई (DUbai) आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी (Abu Dhabi) येथील शेख झायेद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान (Oman) क्रिकेट अकादमी मैदान अशा चार ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने ऑक्टोबरमध्ये युएई आणि ओमानमध्ये होणारा टी-20 विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याचा फायदा होऊ शकतो.