IPL 2021 Auction: आयपीएल 14 च्या लीलावात भाग घेणारे संघ व्यवस्थापन आणि मालक होणार क्वारंटाइन? पहा काय म्हणाली BCCI

इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या आवृत्तीच्या लिलावासाठी कोविड-19 नियम दिले आहे ज्याचा संघ मालक आणि अधिकाऱ्यांना पाळावे लागणार आहे. आयपीएल 2021 चा लिलाव चेन्नई येथे होणार आहे. Cricbuzz दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने चेन्नईत आयपीएलच्या लिलावात भाग घेणाऱ्या फ्रँचायझी मालक आणि अधिकाऱ्यांसाठी कोविड-19 निकष तयार केले आहेत.

File Image | आयपीएल लिलाव (Photo Credits: Twitter @IPL)

IPL 2021 Mini Auction: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 18 फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमाची तारीख निश्चित केली असल्याने इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 लिलावासाठी काऊंटडाऊन सुरु झाला आहे. आयपीएलच्या (IPL) 14व्या आवृत्तीच्या लिलावासाठी कोविड-19 नियम दिले आहे ज्याचा संघ मालक आणि अधिकाऱ्यांना पाळावे लागणार आहे. आयपीएल 2021 चा लिलाव चेन्नई येथे होणार आहे. Cricbuzz दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने चेन्नईत आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) भाग घेणाऱ्या फ्रँचायझी मालक आणि अधिकाऱ्यांसाठी कोविड-19 निकष तयार केले आहेत. क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंना क्वारंटाइन राहणे आवश्यक आहे, परंतु आयपीएल फ्रँचायझी मालक (IPL Franchise Owners) आणि अधिकाऱ्यांना लिलावापूर्वी या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. तथापि, त्यांना लिलावाच्या 72 तास आधी आरटी-पीसीआर टेस्टचे दोन नकारात्मक अहवाल सादर करावे लागतील. (IPL 2021: Ben Stokes याला मुंबई इंडियन्स संघात ट्रेड करा, चाहत्याच्या प्रश्नावर राजस्थान रॉयल्सने दिले भन्नाट उत्तर, पहा Tweet)

चेन्नईच्या ज्या हॉटेलमध्ये लिलाव होणार असेल तिथे सर्वांची एक-एक टेस्ट केली जाईल. लिलावात जास्तीत जास्त 13 सदस्यांना प्रत्येक मताधिकार दर्शविण्याची मुभा दिली जाईल.याबद्दल बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी प्रत्येकाला ईमेल पाठवत नमूद करत म्हणाले की, “कृपया लक्षात घ्या की चेन्नईतील खेळाडूंच्या लिलावात सहभागी झालेल्या संघातील सर्व सदस्यांना लिलावाच्या तारखेच्या 72 तास अगोदर आरटी-पीसीआर टेस्ट घ्यावी लागेल आणि नकारात्मक रिपोर्ट सादर करावे लागेल. त्यानंतर लिलावाच्या दिवशी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर काही वेळातच दुसरी कोरोना चाचणी केली जाईल." दरम्यान, फ्रँचायझी मालकांकडून कायम आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, प्लेअर ट्रेडिंग विंडो 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान बंद राहील. एकदा पुन्हा उघडल्यानंतर, स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिना आधी ट्रेडिंग विंडो बंद होईल.

स्टीव्ह स्मिथ, आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर लिलावादरम्यान बोली लगावली जाईल. आणि या खेळाडूंचे आयपीएलमधील भवितव्य काय होईल हे पाहण्यासाठी चाहतेही उत्साहित असतील. विशेष म्हणजे, भारत-इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयपीएलचा लिलाव आयोजित केला जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

PRS vs MLR BBL 2024-25 Dream11 Team Prediction: पर्थ स्कॉचर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ जाणून घ्या

Perth Scorchers vs Melbourne Renegades BBL 2025 Live Streaming: पर्थ स्कॉर्चर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यात चुरशीचा सामना; भारतात सामन्याचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

WTC 2025 Final Scenario: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विजयाची टक्केवारी समान राहिल्यास, कोणता संघ अंतिम फेरीत प्रवेश जाईल; जाणून घ्या संपूर्ण समीकरण

BRH vs MLS BBL 2024-25 Dream11 Team Prediction: ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात आज रोमांचक सामना; खेळपट्टीचा अहवाल, हेड टू हेड आणि सर्वोत्तम ड्रीम11 संघ येथे पहा

Share Now