IPL 2021: एकाच वेळी चार संघात होणार काट्याची टक्कर; SRH vs MI आणि RCB vs DC सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग असे पहा

आयपीएलचा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. शुक्रवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. आयपीएल 14 मधील साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना असेल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दोन्ही सामन्यांचे लाईव्ह प्रसारण पाहू शकतात.

आयपीएल (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये शुक्रवारी दोन सामने खेळले जातील. आयपीएलच्या (IPL) इतिहासात एकाच वेळी दोन सामने एकाच दिवशी खेळले जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. आयपीएलचा 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, सनरायझर्स यापूर्वीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. शुक्रवारी दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात होणार आहे. आयपीएल 14 मधील साखळी टप्प्यातील हा शेवटचा सामना असेल. चारही संघाचे सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सामना सुरू होईल. तर अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर दोन्ही सामन्यांचे लाईव्ह प्रसारण पाहू शकतात. आणि डिस्नी + हॉटस्टार अॅपवर सामना लाईव्ह स्ट्रीमिंग केला जाईल. (IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सना प्लेऑफमध्ये जायचे असल्यास आज ‘या’ खेळाडूंना करावी लागणार कमाल)

मुंबई आणि हैदराबाद यांच्यात आयपीएल 2021 चा 55 वा सामना अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाईल, तर बेंगलोर विरुद्ध दिल्ली सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद यापूर्वीच प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे जर मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असल्यास त्यांना हैदराबादविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे आहे ज्यामुळे नेट रनरेटमध्ये सुधारणा होईल. तथापि असे न झाल्यास केकेआरचे प्लेऑफमध्ये स्थान जवळपास निश्चित आहे.

दुसरीकडे, अंतिम चारमध्ये स्थान मिळवणाऱ्या आरसीबीला शेवटच्या सामन्यात हैदराबादकडून फक्त चार धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ते सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची शक्यता कमी आहे. RCB चे सध्या 16 गुण आहेत आणि नेट रनरेट चेन्नई सुपर किंग्ज पेक्षा कमी आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. दिल्लीने युएई आवृत्तीतील त्यांचे पाच पैकी 4 सामने जिंकले आहेत.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif