IPL 2021: UAE मध्ये आयपीएल खेळवण्यासाठी BCCI पुढे कठीण आव्हाने, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झाल्यास परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेवर सस्पेंस
बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 14 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याच्या योजनेत आहे. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईमध्ये खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. तथापि, बर्याच संघांच्या आंतरराष्ट्रीय-घरेलू स्पर्धेचे पूर्व-निर्धारित वेळापत्रक आहे आणि टी -20 वर्ल्ड कपसह इतर अनेक आव्हाने देखील भारतीय बोर्डासाठी अडथळा ठरू शकतात.
IPL 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोमध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्याच्या योजनेत आहे. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईमध्ये (UAE) खेळवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्नशील आहे. तथापि, बीसीसीआयसाठी हे कितपत सोपे होईल हा स्वतः एक मोठा प्रश्न आहे. बर्याच संघांच्या आंतरराष्ट्रीय-घरेलू स्पर्धेचे पूर्व-निर्धारित वेळापत्रक आहे आणि इतर अनेक आव्हाने देखील भारतीय बोर्डापुढे असतात. बीसीसीआयने आयपीएलच्या (IPL) 14 व्या आवृत्तीचे उर्वरित सामने 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे पण अरब राष्ट्रात यापूर्वी बरेच स्पर्धा आणि द्विपक्षीय मालिका खेळल्या जाणार आहेत. (IPL 2021 Resumption: आयपीएलचा दुसरा टप्पा UAE येथे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात? 29 मे रोजी घोषणेची शक्यता)
सुरूवातीस, अबू धाबी येथील शेख जाएद क्रिकेट स्टेडियममध्ये जून महिन्यात पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) सहाव्या आवृत्तीतील उर्वरित 20 सामन्याचे आयोजन केले जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अद्याप पीएसएल 2021 च्या उर्वरित वेळापत्रकांची घोषणा केली नसली तरी त्यांना किमान 20 दिवसांसाठी मैदानाची आवश्यकता असेल. यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे जी युएई येथे होण्याची शक्यता अधिक आहे. यापुढे कॅलेंडरमध्ये पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यात तीन वनडे आणि तितकेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. शिवाय, ऑक्टोबर महिन्यात आयसीसी टी-20 वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान-आयर्लंड संघात टी-20 मालिका युएई येथे खेळली जाणार आहे.
दुसरीकडे, टी -20 वर्ल्ड कप (T20 World Cup) देखील बीसीसीआयच्या योजनांमध्ये अडथळा बनू शकतो. भारतात यंदा स्पर्धा होणार असली तरी आयसीसीने युएईला बॅकअप स्थळ म्हणून निवडले आहे. अशाप्रकारे आयसीसी युएईमध्ये टी-20 चॅम्पियनशिपचे आयोजन करणार असेल, तर अमीरात क्रिकेट बोर्डाने 1 ऑक्टोबरपर्यंत सर्व मैदान आयसीसीकडे देण्याचे आश्वासन दिल्याचे द टेलीग्राफने म्हटले आहे. त्यामुळे, बरेच टूर्नामेंट्स आणि द्विपक्षीय मालिका आधीच ठरल्यामुळे, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात आयपीएल 2021 साठी जागा मिळवणे अमिराती क्रिकेट बोर्डासाठी आव्हानात्मक ठरेल. युएईकडे अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम असे तीनच ठिकाणे आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)