IPL 2021 CSK vs MI Live Streaming: मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने दुसरा टप्प्याचे रणशिंग फुंकणार, Star Sports Network वर असे पाहा लाईव्ह प्रक्षेपण

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचे हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. या सामन्याचे स्ट्रीमिंग भारतात Disney + हॉटस्टार आणि JioTV वर उपलब्ध असेल. तसेच तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना लाईव्ह पाहू शकता.

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (Photo Credit: File Image)

IPL 2021 CSK vs MI Live Streaming: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) सामन्याने यूएईमधील आयपीएल (IPL) 2021 च्या दुसरा टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलचे हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. आयपीएल 2921 चा पूर्वार्ध भारतात झाला. यामध्ये एकूण 29 सामने खेळले गेले. तर आता यूएई स्टेजमध्ये (IPL in UAE) एकूण 31 सामने खेळले जातील. आणि आता आयपीएल 2021 तीन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर 19 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याने पुनरागमन करण्यास सञ्ज आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स IPL 2021 चा 30 वा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचे स्ट्रीमिंग भारतात Disney + हॉटस्टार आणि JioTV वर उपलब्ध असेल. तसेच तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना लाईव्ह पाहू शकता. (IPL 2021, CSK vs MI: आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला फटका बसू शकतो, मुंबईविरुद्ध स्टार अष्टपैलू बेंचवर बसण्याची शक्यता)

आयपीएल 2021 पूर्वाधार्त चेन्नईने धमाकेदार सुरुवात केली. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स संघ 10 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याच्या विपरीत मुंबईने नियमितपणे संथ सुरुवात केली. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र यूएईतील मागील हंगामाचे चित्र यंदाही गिरवण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज असेल.

मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, नॅथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, पियुष चावला, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, आदित्य तारे, अॅडम मिल्ने, क्रिस लिन, जेम्स नीशम, ईशान किशन, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, मोहसीन खान, अर्जुन तेंडुलकर, मार्को जॅन्सेन, युद्धवीर सिंह चरक.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकूर, लुंगी एनगिडी, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, इमरान ताहिर, जेसन बेहरनडोर्फ, कृष्णप्पा गौथम, मिशेल सॅन्टनर, आर साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, केएम आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा.