IPL 2021: महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने BCCIच्या चिंतेत वाढ, प्लेऑफ ‘या’ आयोजन करण्याबद्दल विचार
यंदा, बीसीसीआय मुंबई आणि महाराष्ट्रातील उर्वरित स्टेडियमवर आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करीत होती मात्र, अलीकडेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याने बीसीसीआयला आता इतर पर्याय शोधण्यासाठी भाग पाडले आहे.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) भारतात (India) झालेल्या कार्यक्रमासंदर्भात बीसीसीआयच्या अडचणी वाढ होताना दिसत आहेत. यंदा, बीसीसीआय (BCCI) मुंबई आणि महाराष्ट्रातील उर्वरित स्टेडियमवर आयपीएल (IPL) आयोजित करण्याबाबत विचार करीत होती मात्र, अलीकडेच महाराष्ट्रात कोरोनाच्या (Maharashtra Coronavirus) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत गेल्याने बीसीसीआयला आता इतर पर्याय शोधण्यासाठी भाग पाडले आहे. यंदा, एप्रिल-मे महिन्यात आयपीएलचे आयोजन होणार आहे. आयपीएलच्या 14व्या मोसमाचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय आता चार ते पाच ठिकाणांवर विचार करीत आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल 14 चे आयोजन चार किंवा पाच वेगवेगळ्या राज्यात होऊ शकते. शिवाय, राज्यात कोविड-19 प्रकरणांची संख्या वाढल्यामुळे बीसीसीआय अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर नजर ठेवून आहे. (IPL 2021: आयपीएल 14 च्या आयोजनासाठी BCCI अनेक शहरांच्या विचारात; मुंबई, चेन्नईसह 4 ठिकाणांबाबत झाली चर्चा)
यापूर्वी, काही अहवाल म्हटले होते की बीसीसीआय महाराष्ट्रात संपूर्ण स्पर्धा आयोजित करण्याच्या विचारात आहे परंतु तसे होऊ शकले नाही. पण कोविड प्रकरणात नुकत्याच झालेल्या वाढीमुळे बीसीसीआयची खरोखरच चिंता वाढली आहे. बीसीसीआय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी सारख्या खेळाडूंसाठी बायो-सिक्युरिटी बबल तयार करेल, असे अहवालात पुढे म्हटले आहे. शिवाय, मार्च आणि एप्रिल महिन्यात काही राज्यांमध्ये निवडणुका असल्याने त्या शहरांमध्ये आयपीएलचे आयोजित केले जाऊ शकत नाही. पश्चिम बंगालमधील निवडणुका 27 ते 2 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. तामिळनाडू येथे 2 एप्रिल रोजी एक-टप्प्यात मतदान होणार आहे त्यामुळे, बऱ्याच योजना आखण्याची गरज आहे. तथापि, बीसीसीआयकडे आयोजन करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हैदराबाद, बेंगलोर आणि कोलकाता आयपील सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज असतील. याशिवाय अहमदाबादमध्ये आयपीएल प्लेऑफ आणि अंतिम सामना होण्याची मोठी शक्यता आहे.
दरम्यान, कोविड-19 चा धोका दूर करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये लीगचे वेगवेगळे टप्पे घेण्यात येऊ शकतात. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल 8 मार्च रोजी आयपीएल 2021 च्या वेळापत्रकावर चर्चा करेल आणि येत्या आठवड्यात आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते.