IPL 2021 Auction: आयपीएल लिलावापूर्वी एमएस धोनीचा CSK संघ या खेळाडूंना करू शकतो रिलीज, एकेवेळी कोटींमध्ये केली होती खरेदी
आयपीएल 2021 चा मिनी लिलाव फेब्रुवारीमध्ये होण्याची चर्चा सुरु आहे.
IPL 2021 Auction: आयपीएल (IPL) 2021 चा मिनी लिलाव फेब्रुवारीमध्ये होण्याची चर्चा सुरु आहे, परंतु त्याआधी ट्रेडिंग विंडो खुली झाली आहे आणि 20 जानेवारीपर्यंत सर्व संघांना कायम ठेवणाऱ्या व रिलीज करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगण्यात आले आहे. ही यादी आल्यानंतरच आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी लिलावाची तारीख जाहीर होईल. आयपीएल 2021 च्या आयोजनासाठी अधिक काळ शिल्लक नसल्याने संघ बहुतेक खेळाडूंना कायम ठेवण्याची अपेक्षा आहे, परंतु काही खेळाडू निश्चितपणे रिलीज करण्यासाठी संघ तयार असतील. तीन वेळा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्जबद्दल (Chennai Super Kings) बोलायचे तर 13वे सत्र त्यांच्यासाठी काही खास सिद्ध झाले नाही आणि संघ इतिहासात पहिल्यांदा प्ले ऑफ गाठण्यात अपयशी ठरला. आता सीएसकेच्या एका सूत्राने इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, सीएसके आगामी लिलावापूर्वी काही केदार जाधव (Kedar Jadhav) आणि पियुष चावला (Piyush Chawla) यांना रिलीज करण्याच्या तयारीत आहे. (IPL 2021: आयपीएल 2021 ची ऑक्शन डेट रिलीज; 'या' खेळाडूवर लागू शकते सर्वाधिक बोली)
केदार जाधवच्या टीममधून हकालपट्टी करण्याबद्दल बोलताना टीमच्या एका स्तरांनी म्हटले की, हे करणे कठीण आहे. “जाधव आयपीएल 2020 मध्ये सर्वोत्तम फॉर्मामध्ये नव्हता. तसेच त्याला फिटनेसशी संघर्ष करावा लागत होता. सीएसके जाधवकडून आयपीएल 2021 मध्ये पुढे जाईल, टीम मॅनेजमेंटमधील प्रत्येकाला वाटते की हा कठोर निर्णय घेणे आणि भविष्यात गुंतवणूक करणे योग्य आहे.” जाधवने युएईमध्ये आयपीएल 2020 मध्ये संघासाठी खेळलेल्या 8 सामन्यात अवघ्या 62 धावा फटकावल्या आणि एकही षटकार ठोकू शकला नाही. संघर्ष करत असतानाही कर्णधार एमएस धोनीने त्याच्यावर विश्वास दर्शवला आणि बऱ्याच संधी दिल्या, पण तो अपयशी ठरला. अशा परिस्थितीत जर त्याला रिलीज केले तर आश्चर्य वाटणार नाही. जाधवला सीएसकेने 2018 च्या मेगा लिलावात 7.8 कोटीमध्ये खरेदी केले होते. शिवाय, आगामी स्पर्धेत मुंबई इंडियन्स बहुतेक खेळाडू कायम ठेवू शकते असेही सुचवण्यात आले आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडे 14.75 कोटी रुपये शिल्लक आहेत तर सनरायझर्स हैदराबादकडे 10.1 कोटी आहेत. दिल्ली कॅपिटल्सकडे 9 कोटी, कोलकाता नाईट रायडर्सकडे 8.5 कोटी आहेत. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या पर्समंदाचे 6.4 कोटी रुपये शिल्लक आहेत.