IPL 2021 Auction: ‘या’ टॉप 5 टी-20 Specialists फलंदाजांना लिलावात मिळू शकते सर्वाधिक मागणी, टीम पाडतील पैशांचा पाऊस
18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये मिनी-लिलाव आयोजित केला जाणार आहे. लिलावासाठी एकूण 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले असून यामध्ये अनेक टी-20 तज्ञांचा देखील समावेश आहे ज्यांना यंदाच्या लिलावात मोठी मागणी मिळू शकते. आज आपण असाच 5 टी-20 तज्ञ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर लिलावात फ्रँचायझी पैशांचा पाऊस पडू शकतात.
IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 लिलावासाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये (Chennai) मिनी-लिलाव आयोजित केला जाणार आहे. यापूर्वी, सर्व आठ फ्रँचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंना खेळाडूंची यादी जाहीर केली जी पाहून चाहतेही थक्क झाले. स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव, हरभजन सिंह यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रसिद्ध खेळाडूंना फ्रँचायझींनी बाहेरचा रास्ता दाखवला. लिलावासाठी एकूण 292 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले असून यामध्ये अनेक टी-20 तज्ञांचा देखील समावेश आहे ज्यांना यंदाच्या लिलावात मोठी मागणी मिळू शकते. जगातील नंबर एक टी-20 डेविड मलान (Dawid Malan) यासारख्या छोट्या स्वरूपातील तज्ञ खेळाडूंची आयपीएल लिलावात (IPL Auction) मोठी मागणी असेल. आज आपण असाच 5 टी-20 तज्ञ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यावर लिलावात फ्रँचायझी पैशांचा पाऊस पडू शकतात. (IPL Auction 2021: ‘हा’ भारतीय आहे आयपीएल लिलाव राजा, नाही मोडू शकला सर्वात महागड्या खेळाडूचा रेकॉर्ड; ‘हा’ ऑस्ट्रेलियन सर्वात महाग Costliest विदेशी क्रिकेटर)
1. ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटर आता पुन्हा एकदा लिलाव प्रक्रियेत उतरला आहे. सामर्थ्यवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला मॅक्सवेल पुन्हा टीम्सच्या रडारवर असेल. नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेमध्ये टीम इंडियाविरुद्ध केलेल्या शानदार फलंदाजीमुळे त्याला पुन्हा एकदा लीगमध्ये मोठी मागणी मिळण्याची अपेक्षित असेल.
2. डेविड मलान
इंग्लंडचा मलान खेळाच्या छोट्या स्वरूपातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि सध्या टी-20 फलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. तो सुरुवातीला लो ऑर्डर फलंदाज म्हणून चर्चेत आला आणि हळूहळू टॉप-ऑर्डर फलंदाज म्हणून नावलौकिक आला. आतापर्यंत त्याने 19 डावात 53.44 च्या सरासरीने 855 धावा केल्या आहेत.
3. मोहम्मद अझरुद्दीन:
केरळच्या या युवा फलंदाजाने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत स्वतःसाठी नाव कमावले आणि 37 चेंडूत तुफान शतकी खेळी केली. त्याने मुंबईविरुद्ध फक्त 54 चेंडूत नऊ चौकार आणि 11 षटकारांसह 137 धावा केल्या. रिषभ पंतच्या 32 चेंडू आणि रोहित शर्माच्या 35 चेंडू टी-20 शतकानंतर अझहरुद्दीनने तिसरे जलद शतक ठोकले. जुनिअर अझहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवा फलंदाजाला हा लिलाव कारकीर्दीत महत्वाचा टप्पा ठरू शकतो.
4. आरोन फिंच:
टॉप ऑर्डरवर त्याच्या आक्रमक बॅटिंगने फिंच विरोधी संघावर हल्ला चढवू शकतो. 2020 हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने बर्याच अपेक्षांसह त्याला संघात समावेश केला होता पण, ऑस्ट्रेलियन फलंदाज कामगिरी करण्यात अपयशी ठरला. मात्र, लिलावात तो पुन्हा एकदा टीम्सचे लक्ष वेधू शकतो.
5. केदार देवधर:
घरगुती टी-20 लीग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत देवधरने 69.80 च्या सरासरीने आठ सामन्यांत दुसऱ्या सर्वाधिक 349 धावा केल्या. देवधर पूर्वी डेक्कन चार्जर्सचा एक भाग होता परंतु तो प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तथापि, त्याचा अलीकडील फॉर्म पाहता, 31 वर्षीय फलंदाजाला यंदा आयपीएलचा मोठा करार मिळू शकतो.