IPL 2021: अनुचित की विचलित करण्यासाठी? भारताच्या वाढत्या ‘भयावह’ कोविड-19 घटनांमध्ये आयपीएल खेळवण्यावर Adam Gilchrist यांचा BCCI ला सवाल
भारताच्या ‘भयावह’ परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने सर्व भारतीयांना ‘शुभेच्छा’ दिल्या. हे करत असताना, माजी विकेटकीपरने देशातील आव्हानात्मक काळात बीसीसीआयला आयपीएल आयोजित करण्याबाबत सवाल केला.
IPL 2021: गेल्या काही आठवड्यांत भारताच्या कोविड-19 प्रकरणांत (India COVID-19 Cases) विक्रमी वाढ झाली आहे आणि प्रत्येक दिवस संख्या वाढत असताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 2,600 पेक्षा अधिक लोक दगावले आहेत, तर या कालावधीत 3,00,000 हून अधिक जणांना विषाणूचा संसर्ग झाला आहे. भारताच्या ‘भयावह’ परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) सर्व भारतीयांना ‘शुभेच्छा’ दिल्या. हे करत असताना, माजी विकेटकीपरने देशातील आव्हानात्मक काळात बीसीसीआयला (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) आयोजित करण्याबाबत सवाल केला. “भारतातील सर्वांना शुभेच्छा, कोविड प्रकरणांची भीतीदायक आकडेवारी. आयपीएल (IPL) सुरू आहे. अनुचित? किंवा प्रत्येक रात्री विचलित करण्यासाठी? आपले विचार काहीही असो, तुमच्यासाठी प्रार्थना!” (Coronavirus विरोधात देशाच्या लढाईमध्ये Ravichandran Ashwin ने सुरु केले ‘हे’ चांगले काम, अशाप्रकारे करणार COVID-19 रुग्णांची मदत)
उल्लेखनीय म्हणजे, जागतिक महामारीच्या काळात आयपीएल 2021 काही खास निकषांतर्गत होत आहे. आयपीएल 2021 सुरळीत पार पडण्यासाठी सर्व संघ कठोर जैव-सुरक्षित बबलमध्ये राहत आहेत. देवदत्त पडिकक्कल, अक्षर पटेल आणि लियाम लिविंगस्टोन अशा काही खेळाडूंना स्पर्धेपूर्वी विषाणूचा संसर्ग झाला असला तरी आता त्यांचा कोरोना व्हायरस अहवाल नकारात्मक आला आहे. दरम्यान, आयपीएल 2021 स्पर्धेचा प्रारंभिक भाग बंद दाराच्या मागे होत असून प्रेक्षकांच्या उपस्थतीवर अंतिम निर्णय नंतर घेतला जाईल. तथापि, कोरोना व्हायरस प्रकरणांमध्ये अशा वाढीसह, संपूर्ण हंगाम प्रेक्षकांशिवाय आयोजित केला जाण्याची शक्यता दिसत आहे. शिवाय, हंगाम सुरू झाल्यापासून कोणत्याही खेळाडूला विषाणूचा संसर्ग झालेला नाही आणि जर सर्व संघ बायो-बबलच्या नियमांचे पालन करत राहिली तर देशामध्ये सकारात्मक घटनांमध्ये वाढ असूनही आयपीएल सुरळीत सुरु ठेवता येईल.
दुसरीकडे, शनिवारी कोरोना विषाणूचे देशभरात 3 लाख 46 हजार 786 नवीन रुग्ण आढळले आहेत. या व्यतिरिक्त या प्राणघातक विषाणूमुळे 2 हजार 624 लोक मरण पावले. आज सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनाचे दोन लाखाहून अधिक नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवार सकाळी सांगितले की, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 89 हजार 544 वर पोहचली असून सक्रिय प्रकरणे 25 लाख 52 हजार 940 पर्यंत गेली आहेत.