IPL 2020 Update: झहीर खानने करवली मुंबई इंडियन्सच्या टीम-रूमची टूर, खेळाडू अशाप्रकारे करतात मजा-मस्ती (Watch Video)
माजी क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक झहीर खानने टीम रूमची टूर घडवून दिली. झहीर म्हणाला, "आम्ही नेहमीच टीम रूमवर लक्ष केंद्रित केले आहे."
यंदा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 युएईमध्ये (UAE) खेळला जाईल. या स्पर्धेसाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) वगळता सर्व टीम्सने सराव सुरु केला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमनेही मैदानी सराव सुरू केला आहे. यासह सर्व खेळाडूं टीम रूममध्ये कुटुंब आणि सहकारी खेळाडूंबरोबरही मजा करत आहेत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीम अबू धाबी येथे राहत आहेत आणि त्यांच्या टीम रूममध्ये इनडोअर जिम रूम, गाणी आणि इनडोअर गेम्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. माजी क्रिकेटर आणि मुंबई इंडियन्सच्या क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक झहीर खानने (Zaheer Khan) टीम रूमची टूर घडवून दिली. झहीर म्हणाला, "आम्ही नेहमीच टीम रूमवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण इथेच जास्त बॉण्डिंग होते. खेळाडू येथे सर्वाधिक वेळ घालवतात. आपण पाहू शकता की, खेळाडूंना येथे सुमारे तीन महिने राहायचे आहेत. हा बराच मोठा काळ आहे. प्रत्येकाचे कुटुंब आणि खेळाडू येथे एकत्र जमतात, म्हणून हे एक प्रकारे आमचे 'झोन' आहे." (IPL 2020 Update: रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून 'सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा' मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक झहीर खानने केला खुलासा, वाचा सविस्तर)
व्हिडिओमध्ये टीम रूम, जिम आणि गेम झोन पहिले जाऊ शकते जिथे खेळाडू मनोरंजक कार्यात भाग घेताना दिसू शकतात. गायन सत्रासाठी स्टेजवर जाताना हार्दिक पांड्या रॉकस्टार लूक परिधान केलेला दिसला. व्हिडिओ दरम्यान, झहीरने संपूर्णपणे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना समर्पित केलेली एक वॉलही दाखविली, ज्यात स्टेडियममधील चाहत्यांचे टीमला चीअर करतानाचे फोटो आहेत.
“सर्वात मोठे हरवलेले घटक म्हणजे आमची पलटन (एमआय फॅन्स) स्टेडियममधून जयघोष करीत आहेत, म्हणून आम्ही फक्त आमच्या खेळाडूंना तसेच आमच्या संपूर्ण पथकाला हा संदेश पोहचवायचा आहे, की आम्ही कोठेही असलो तरी पलटन देखील तिथे असेल." यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलचे 4 वेळा विजेतेपद मिळविणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये मुंबई चॅम्पियन बनली आहे.