IPL 2020 Update: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू इतके दिवस नाही खेळू शकणार सामने; राजस्थान रॉयल्सही बेन स्टोक्सविना करणार सुरुवात

आयपीएल गवर्निंग काउन्सिलने कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना बायो बबलमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता न देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेन स्टोक्स आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Instagram/rajasthanroyals)

IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या हंगामासाठी सर्व खेळाडू कसून तयारी करत आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनेही (IPL Governing Council) रविवारी आगामी आयपीएल हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पण, आयपीएल टीमसाठी इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) खेळाडूंच्या रूपात मोठा झटका बसला आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) ब्रिटनहून आलेला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंना सहा दिवसांच्या अनिवार्य क्वारंटाइन कालावधीतून जाण्याची शक्यता आहे. आयपीएल (IPL) गवर्निंग काउन्सिलने कोरोना व्हायरस महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना बायो बबलमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता न देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत. (IPL 2020 Update: सुरेश रैना, लसिथ मलिंगा, हरभजन सिंहसह 6 तगड्या खेळाडूंची पीछेहाट, पाहा 13 व्या मोसमात भाग न घेणाऱ्या खेळाडूंची लिस्ट व त्यांची रिप्लेसमेंट)

सध्या इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 आणि त्यानंतर वनडे मालिका खेळली जाणार आहे. 16 सप्टेंबर रोजी मालिकेचा अखेरचा सामना खेळला जाईल. दरम्यान, कॅरिबियन प्रीमियर लीगमधून येणाऱ्या खेळाडूंनाही कोणतीही सवलत मिळणार नाही. सीपीएल 10 सप्टेंबर रोजी संपेल आणि 12 सप्टेंबरपर्यंत खेळाडू युएईमध्ये पोहोचतील. अशा स्थितीत सर्व खेळाडूंना सहा दिवस क्वारंटाइन रहावे लागेल ज्यानंतर ते टीममधील अन्य खेळाडूंसोबत सामील होऊ शकतील. स्पोर्टस्टारच्या अहवालानुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया खेळाडूंना 22 सप्टेंबरपर्यंत क्वारंटाइन केले गेले तर काहींना त्यांच्या संबंधित फ्रँचायझीकडून पहिला सामना खेळू शकणार नाही. राजस्थान रॉयल्सला याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे.

22 सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर, टॉम कुरन आणि जोस बटलर सामील होऊ शकणार नाही. दुसरीकडे, त्यांना बेन स्टोक्सविना या हंगामाची सुरुवात करावी लागू शकते. सूत्राने PTIला दिलेल्या वृत्तात म्हटले की न्यूझीलंडमधील क्वारंटाईन नियमांनुसार स्टोक्सने तिथे 14 दिवस पूर्ण केले आहेत. तो आपल्या वडिलांसह आणि कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवेल, त्यानंतर त्याला काही काळ युएईत क्वारंटाईन रहाणे लागणार आहे. याक्षणी ही प्राथमिकता नाही, म्हणून फ्रेंचायझीने त्याला यायलाही सांगितले नाही. त्याला त्याच्या कुटुंबासमवेत वेळ घालवू द्या आणि त्यांची उपलब्धता नंतर कळेल, असे फ्रचांईजीचे म्हणणे आहे. जागतिक क्रिकेटमधील हा अष्टपैलू खेळाडू काही सामन्यांमधून बाहेर झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सचा नक्कीच नुकसान होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif