Virat kohli Turns Hotel Balcony into Gym: विराट कोहलीने हॉटेलच्या बाल्कनीचे Gym मध्ये केले रूपांतर, RCBने दाखवली क्वारंटाइनमध्ये कर्णधाराच्या फिटनेस रिजिमची झलक (Watch Video)

यादरम्यान विराटने हॉटेलच्या बाल्कनीला Gym मध्ये बदलले आणि तिथेच कसरत करू लागला. आरसीबीने त्यांच्या कर्णधाराने हॉटेल बाल्कनीला जिममध्ये बदलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

विराट कोहलीचे बाल्कनी जिम रिजिम (Photo Credit: Instagram)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 13व्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) हंगामा अगोदर दुबईला पोचताच पाच दिवसांपूर्वी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. कोहली हा जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि तो त्याच्या फिटनेसबद्दल नेहमी सतर्क आणि सक्रिय असतो. युएईमध्ये (UAE) आयपीएलसाठी (IPL) गेलेला कोहली 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करीत आहे. यादरम्यान त्याने हॉटेलच्या खोलीत कसरत केली. विराटने हॉटेलच्या बाल्कनीला Gym मध्ये बदलले आणि तिथेच कसरत करू लागला. बेंगळुरूस्थित फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या कर्णधाराने हॉटेल बाल्कनीला जिममध्ये बदलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. बंगलोर टीमचा क्वारंटाइन कालावधी गुरुवारी पूर्ण होईल. तीन कोरोना व्हायरस टेस्टचे अहवाल नकारात्मक आल्यावर ते मैदानी प्रशिक्षण सुरू करण्यास सक्षम असतील. (IPL 2020 Update: आयपीएल 13 पूर्वी क्वारंटाइनने शिखर धवन त्रस्त, 'सो गया ये जहां' गाण्याने मांडली व्यथा Watch Video)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) टीम कप्तान कोहलीचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'रूम वर्कआउट' करतानाचा व्हिडिओ शेअर केला. यात विराट बाल्कनीमध्ये पुश-अप्स करताना दिसत आहे. डंबेलद्वारे वजन प्रशिक्षण देखील करत आहे. आता आपल्या फिटनेससाठी परिचित असलेला कोहली आयपीएल चॅलेंजसाठी सज्ज झाला असल्याचे या व्हिडिओद्वारे दिसत आहे. "कॅप्टन कोहलीच्या बाल्कनी जिममध्ये आपले स्वागत आहे. दिवस सीझ करा!" असे म्हणत आरसीबीने व्हिडिओ शेअर केला.

 

View this post on Instagram

 

Welcome to Captain Kohli’s b̶a̶l̶c̶o̶n̶y̶ gym. Seize the day! #PlayBold #BoldIsFit #WeAreChallengers

A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore) on

टी-20 लीगची मूळ आवृत्ती 29 मार्च रोजी भारतात सुरू होणार होती. पण, कोविड-19 मुळे हा हंगाम बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यावर आता ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे आणि सर्व संघांनी स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. आरसीबी हा आयपीएलमधील सर्वात नामांकित संघांपैकी एक असून दुर्दैवी बाद म्हणजे ते आजवर एकही आयपीएल विजेतेपद जिंकू शकले नाही. मात्र, यंदा कर्णधार म्हणून विराट, आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, मोईन अली, क्रिस मॉरिस आणि युजवेंद्र चहलसारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या जोरावर आयपीएल जेतेपद मिळवू इच्छित असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif