IPL 2020 Update: BCCI अडचणीत! VIVO नंतर पेटीएम, बायजू आणि ड्रीम11 या चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या प्रायोजकांवरही बंदी घालण्याची मागणी

चिनी उत्पादनांवर निर्बंध घालण्याच्या मोहिमेंतर्गत बीसीसीआयने पेटीएम, बायजू आणि ड्रीम 11 या चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या प्रायोजकांवरही बंदी घालावी, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचाने केली आहे. विवोने इंडियन प्रीमियर लीगच्या शीर्षक प्रायोजकत्वाच्या करारातून माघार घेतल्यामुळे बीसीसीआय सध्या नवा शीर्षक प्रायोजक शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

चिनी मोबाईल विवो सोबतच करार यंदाची स्थगित केल्यावर संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी हंगामासाठी 41 दिवस शिल्लक असताना मुख्य प्रायोजक शोधण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) संघर्ष कायम आहे. बीसीसीआयच्या या प्रयत्नात अजून वाढ होताना दिसत आहे. कोणतेही चीनी दुवे असलेल्या प्रायोजकांशी बीसीसीआने संबंध मोडावे अशी मागणी आता केली जात आहे. चिनी उत्पादनांवर निर्बंध घालण्याच्या मोहिमेंतर्गत बीसीसीआयने पेटीएम, बायजू आणि ड्रीम 11 या चिनी कंपन्यांशी संबंध असणाऱ्या प्रायोजकांवरही बंदी घालावी अशी मागणी आरएसएस संलग्न स्वदेशी जागरणमंचाने (Swadeshi Jagran Manch) केली आहे. स्वदेशी जागरण मंचाने ‘चीन छोडो’ आंदोलन सुरू केले आहे आणि चिनी कंपनीशी संबंध असलेल्या कोणत्याही आयपीएल प्रायोजकांचा (IPL Sponsors) निषेध करेल असे म्हटले. विवोने आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वाच्या करारातून माघार घेतल्यामुळे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 13व्या हंगामासाठी नवीन शीर्षक प्रायोजक शोधण्यात बीसीसीआय सध्या प्रयत्नशील आहे. (IPL 2020 Update: UAE ला फक्त 24 खेळाडूंना घेऊन जाता येणार, 'या' 3 फ्रँचायझींना वगळावे लागणार प्रत्येकी एक खेळाडू)

आउटलुक इंडियाच्या अहवालानुसार मंचचे ज्येष्ठ पदाधिकारी धनंजय भिडे म्हणाले की, ‘आत्मनिभार भारत’ चळवळीत भारतातील उद्योजकांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. क्रिकेटला स्वावलंबी भारत आणि चिनी प्रायोजक यांच्यात निवड करावी लागेल.” पेटीएम, ड्रीम 11, बिजू या प्रायोजकांना चिनी फंडिंग प्राप्त होते आणि यामुळे ती थांबवावी अशी एसजेएमची भावना आहे.

ड्रीम 11 प्रायोजकांत टँसेट या चिनी कंपनीची 20 टक्के हिस्सेदारी आहे. दुसरीकडे, टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजक असलेल्या बायजूमध्ये टँसेटची 15 टक्के  हिस्सेदारी आहे, तर देशांतर्गत क्रिकेटचे प्रायोजक पेटीएममध्ये चीनच्या कंपनीची सर्वाधिक 55 टक्के हिस्सेदारी आहे. दरम्यान, आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबर रोजी होणार असून अंतिम सामन्यात 10 नोव्हेंबर रोजी सामना खेळला जाईल. युएईमधील तीन ठिकाणं (युएई, अबू धाबी आणि शारजाह) एकूण 60 सामन्यांसाठी वापरली जातील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now