IPL 2020 Update: सुरेश रैनासाठी चेन्नई सुपर किंग्सचे दार बंद? 13व्या सत्रातून एकाएकी माघार घेतल्याने रैना 2021 च्या लिलावात उतरण्याची शक्यता
आयपीएलच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, परिस्थिती पाहता रैना एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या पुढील आयपीएलपूर्वी चेन्नई संघाबाहेर जाऊ शकतो.
सुरेश रैना (Suresh Raina) 'वैयक्तिक कारणास्तव' इंडियन प्रीमियर लीगमधून (Indian Premier League) माघार घेतल्याचे म्हटले जात होते, परंतु चेन्नई सुपर किंग्जबरोबर (Chennai Super Kings) त्याचा लांबचा प्रवास 2021 च्या हंगामापूर्वी संपण्याची चिन्ह दिसत आहेत. सीएसकेमधून (CSK) रैनाच्या अचानक एक्सिटने अनेकांना धक्का बसला. रिपोर्ट्सनुसार, कॅम्पमधील कोरोना व्हायरस प्रकरणात वाढ झाल्यानंतर टीम मॅनेजमेंटने त्याला शांत केले पण रैना परतण्यासाठी उत्सुक होता. तो शनिवारी (29 ऑगस्ट) रोजी भारतात परतला. रैनाच्या बाहेर पडण्याकडे लक्ष वेधताना सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन (N Srinivasan) यांनी त्याच्यावर शाब्दिक टिप्पणी केली. चेन्नईचा संघ दुबईमध्ये थांबला आहे आणि त्यांच्या टीममध्ये कोविड-19 ची 13 प्रकरणे आढळली आहे ज्यात संघाचे दोन महत्त्वाचे सदस्य दीपक चाहर आणि रुतूराज गायकवाड यांचा समावेश आहे. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारंटाइन काळात 32 वर्षीय रैनाच्या वागण्यामुळे संघ व्यवस्थापन खूष नव्हता. सीएसके अध्यक्ष आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासनही संतापले होते. (IPL 2020 Update: हॉटेल रूममुळे सुरेश रैना आयपीएल 13 मधून बाहेर पडला? सीएसके बॉस एन श्रीनिवासन काय म्हणाले एकदा वाचाच)
आयपीएलच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, “सीएसकेच्या नियमानुसार प्रशिक्षक, कर्णधार आणि व्यवस्थापक यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी Suite (प्रशस्त खोली) मिळतात पण रैना देखील टीम ज्या ठिकाणी राहतो त्या प्रत्येक हॉटेलमध्ये स्वीट मिळवते. दुबईतही रैनाला अशाच पद्धतीची प्रशस्त खोली मिळाली होती, पण फक्त त्याच्या खोलीला गॅलरी नव्हती.’’ ते म्हणाले, “हा मुद्दा होता परंतु मला असे वाटत नाही की भारतात परतण्यासाठी हे एक मोठे कारण होते. संघात कोविडच्या घटनांमध्ये वाढ होण्यापेक्षा मोठा मुद्दा असू शकतो.’’ ते म्हणाले की, परिस्थिती पाहता रैना एप्रिल 2021 पासून सुरू होणाऱ्या पुढील आयपीएलपूर्वी चेन्नई संघाबाहेर जाऊ शकतो. या परिस्थितीत रैना परत येणार आहे का, या परिस्थितीत बदल होऊ शकतो, याविषयी सूत्रांनी सांगितले की, “या सत्रात तो उपलब्ध होणार नाही आणि सीएसकेने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात हे स्पष्ट झाले आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे उच्च अधिकारी निराश झाले आहेत.”
ते म्हणाले, "जो खेळाडू निवृत्त झाला असेल आणि कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नाही तो सीएसकेमध्ये परत येईल अशी फारच कमी शक्यता आहे. तो लिलावात परत येईल आणि कोणतीही टीम त्याला घेऊ शकेल.’’ सीएसकेने रुतुराजवर मोठी बोली लावली होती आणि आता क्वारंटाइनमधून परत आल्यानंतर तंदुरुस्त होईल आणि दोन कोविड-19 नेगेटिव्ह टेस्ट झाल्यावर सराव सत्रात भाग घेईल. आयपीएलच्या सूत्रांनी सांगितले की, “सीएसकेने अद्याप रैनासाठी इतर कोणत्याही खेळाडूची मागणी केली नाही. त्यांनी अद्याप यावर निर्णय घेतला नाही.’’ रैनाने जैव-सुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केले अशी चर्चा सध्या रंगली आहे. या प्रकरणात रैनाच्या माफीचा फारसा परिणाम होणार नाही कारण संघ भविष्याबद्दल विचार करीत आहे. सूत्रांनी सांगितले की, "माफी मागण्याबाबत मला माहित नाही परंतु आता सीएसकेला भविष्यासाठी रुतुराज तयार करण्याची इच्छा आहे आणि धोनी आणि (मुख्य प्रशिक्षक स्टीफन) फ्लेमिंग त्यानुसार त्यांची रणनीती आखतील.’’