IPL 2020 Update: 'आयपीएल आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही,' न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने फेटाळलं वृत्त
मंडळाने आयपीएलबाबत बीसीसीआयशी संपर्क साधलेला नाही याची Radio New Zealandशी बोलताना न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ते रिचर्ड बूक यांनी पुष्टी केली.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या आवृत्तीचे आयोजन करण्याची मंडळाने ऑफर केली असल्याचा दावा केल्याचा अहवाल न्यूझीलंड क्रिकेटने (New Zealand Cricket) नाकारला आहे. मंडळाने आयपीएलबाबत (IPL) बीसीसीआयशी (BCCI) संपर्क साधलेला नाही याची Radio New Zealand शी बोलताना न्यूझीलंड क्रिकेटचे प्रवक्ते रिचर्ड बूक यांनी पुष्टी केली. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत श्रीलंका, युएईनंतर न्यूझीलंडनेही आयपीएलच्या 13 व्या हंगामाचं आयोजन करण्याची तयारी दाखवल्याची माहिती दिली होती. “हा अहवाल फक्त अफ़वाह आहे. आम्ही आयपीएल होस्ट करण्याची ऑफर दिली नाही किंवा तसे करण्याचा दृष्टीकोनही आमच्याकडे नाही,” Radio New Zealand ने बूकचे म्हणणे उद्धृत केले. न्यूझीलंडपूर्वी श्रीलंका क्रिकेट आणि अमिराती क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) लीगचे आयोजन करण्याची ऑफर दिली होती. भारतात स्पर्धा आयोजित करण्यास आधीचं आल्यास दुसऱ्या देशात आयपीएलचे आयोजन करण्यास बीसीसीआयने तयारी दर्शवली आहे. (IPL 2020 Update: BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा क्रिकेट चाहत्यांना इशारा; परदेशात आयोजित करणे महाग, भारत पहिली प्राथमिकता)
करोना परिस्थितीमुळे बीसीसीआयने 13 वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला होता. परंतू 4 हजार कोटींचं नुकसान टाळण्यासाठी बीसीसीाय सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. यासाठी बीसीसीआयला आयसीसी टी-20 विश्वचषकाबद्दल नेमका काय निर्णय घेतं हे पहावं लागणार आहे.
दुसरीकडे, बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले, कोविड-19 मुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर आयपीएलचे आयोजन भारतातच होईल याची खात्री करणे देखील बीसीसीआयचे प्राधान्य आहे. गांगुली म्हटले की, “आम्हाला ते हवे आहे, जसे मी म्हणालो होतो की क्रिकेट परत पाहिजे. आमच्यासाठी, प्रत्यक्षात मदत करणार्या याक्षणी हा हंगाम बंद आहे. आम्ही आमच्या घरगुती हंगाम मार्चमध्ये संपविला आणि त्यानंतर आम्हाला आयपीएल रद्द करावा लागला जो आमच्या घरगुती हंगामाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. आम्हाला आयपीएल हवे आहे कारण आयुष्य सामान्य होण्याची गरज आहे आणि क्रिकेट नेहमीच्या स्थितीत जाणे आवश्यक आहे परंतु टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात आयसीसीकडून अद्याप निर्णय आलेला नाही.”