Jonty Rhodes Flying Catch: जॉन्टी ऱ्होड्सच्या भन्नाट कॅचवर नेटकरी फिदा, ICCनेही पोस्ट केला चपळ क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओ
दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी जॉन्टी रोड्स सध्या इंडियन प्रीमियर लीग फ्रेंचायजी किंग्ज इलेव्हन पंजाबसह कार्यरत आहेत. किंग्ज इलेव्हनच्या सोशल मीडिया हँडलवर जॉन्टी खेळाडूंना कॅच घेण्याचं तंत्र शिकवताना एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात त्यांनी एक सुरेख झेल घेतला. माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाजाने पकडलेला हा भन्नाट कॅच पाहून यूजर्स देखील त्याच्यावर फिदा झाले.
सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना आजवरचे महान फलंदाज मानले जाते, मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न महान गोलंदाज मानले जातात त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचे अनुभवी जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांची महान क्षेत्ररक्षक अशी ओळख आहे. 51 वर्षीय जोंटीकडे झेल पकडण्याची, धावा करण्याची आणि उत्तम क्षेत्ररक्षणासाठी डाइव्ह करण्याची अप्रतिम प्रतिभा होती. जॉन्टीने 17 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेतली आणि गेली अनेक वर्षे लीग क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आपला अनुभव ते शेअर करत आहेत. सध्या जॉन्टी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रेंचायजी किंग्ज इलेव्हन पंजाबसह (Kings XI Punjab) कार्यरत आहेत. जॉन्टी आयपीएल 2020 साठी पंजाब खेळाडूंना क्षेत्ररक्षण करण्याचा सराव करीत आहे. ते केवळ क्षेत्ररक्षकांनाच सूचना देत नाही, तर ते स्वतःच मैदानात उतरले आणि झेल कसा पकडायचा याचा नमुना दाखवला. (IPL 2020 MI Practice Session: रोहित शर्माचे नेट सत्रात दिग्विजय देशमुखला मिळाले मार्गदर्शन, मुंबई इंडियन्स कर्णधाराच्या एका सल्ल्याने पाहा काय घडले Watch Video)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जॉन्टीने आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने नाव कमावलं. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सोशल मीडिया हँडलवर जॉन्टी खेळाडूंना कॅच (Jonty Rhodes Catches) घेण्याचं तंत्र शिकवताना एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात त्यांनी एक सुरेख झेल घेतला. माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाजाने पकडलेला हा भन्नाट कॅच पाहून यूजर्स देखील त्याच्यावर फिदा झाले आणि स्पर्धात्मक क्रिकेटपासून इतकी वर्षे दूर राहिल्यावरही त्यांच्या चॅपलतेचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) देखील जॉन्टी रोड्सचा व्हिडिओ रीट्वीट केला आणि लिहिले की त्याने 17 वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, परंतु जॉन्टी रोड्स अजूनही कॅच पकडण्यात माहिर आहेत.
फ्लाइंग जॉन्टी...
या माणसाला सलाम
सर्वोत्कृष्ट फील्डर
काय कॅच पकडला...
जॉन्टी रोड्सच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 34 आणि वनडे क्रिकेटमध्ये 105 झेल पकडले आहेत, शिवाय जॉन्टी यांनी डझनभर अशक्य असे कॅच पकडले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)