IPL 2020 Update: आयपीएलच्या 13 व्या हंगामातून हरभजन सिंह आऊट, CSK गोलंदाजाने सोशल मीडियावर सांगितले 'हे' कारण

चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज हरभरजन सिंहने यंदा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण भारत सोडू शकणार नसल्याचं सांगितलं आहे. भज्जीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि यामागील कारण उघड केले. चेन्नईसाठी हा दुसरा मोठा झटका आहे. यापूर्वी सुरेश रैना सीएसके कॅम्पमध्ये कोरोना प्रकरणं आढळल्याने भारतात परतला.

हरभजन सिंह (Photo Credits: IANS)

यंदा इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) हंगामात चेन्नई चेन्नई सुपर किंग्ससमोर (Chennai Super Kings) संकट दूर व्हायचे नावच घेत नाही. कोरोना व्हायरसमुळे 13 टीम मेंबरना पुन्हा क्वारंटाईन व्हावं लागलं. मग सुरेश रैनाने कौटुंबिक कारणास्तव एकाएकी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता सीएसकेचा (CSK) आणखी एका अनुभवी खेळाडूने स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सुपर किंग्सचा प्रमुख गोलंदाज हरभरजन सिंहने (Harbhajan Singh) यंदा आयपीएलमध्ये (IPL) खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण भारत सोडू शकणार नसल्याचं सांगितलं आहे. भज्जीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आणि यामागील कारण उघड केले. हरभजन म्हणाला की, "मी वैयक्तिक कारणास्तव यावर्षी आयपीएल खेळणार नाही. ही कठीण वेळ आहेत आणि मी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालवत असल्यामुळे मला काही गोपनीयतेची अपेक्षा आहे. सीएसके व्यवस्थापन अत्यंत सहाय्यक आहे आणि मी त्यांना आयपीएलसाठी शुभेच्छा देतो." (IPL 2020 Update: सुरेश रैनानंतर चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का, हरभजन सिंहने आयपीएल 13 मधून घेतली माघार-रिपोर्ट)

सीएसकेचा संपूर्ण संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला होता, पण हरभजन संघाबरोबर गेला नव्हता. तो नंतर युएईला पोहोचेल असं सांगण्यात येत होतं. शिवाय, युएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नईला झालेल्या पाच दिवसांच्या ट्रेनिंग कँपमधूनही भज्जी गैरहजर होता आणि अखेरीस हरभजनने न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वेळा आयपीएल विजेता चेन्नईसाठी हा दुसरा मोठा झटका आहे. यापूर्वी सुरेश रैना सीएसके कॅम्पमध्ये कोरोना प्रकरणं आढळल्याने भारतात परतला.

आयपीएलच्या 13 व्या हंगामाला काही दिवस शिल्लक असताना खेळाडूंचे माघार घेण्याचे सत्र सुरूच आहे. रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. मुंबईसाठी हा मोठा धक्का आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now